शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धर्मांतरण प्रकरणाचे धागेदोरे; उत्तरप्रदेश दहशतवाद विरोधी पथकाचा नागपुरात छापा; तीन जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 17:32 IST

ATS : गोरगरिबांना पैशाचे आमिष दाखवून, त्यांच्या छोट्याछोट्या गरजा पूर्ण करून त्यांचे पद्धतशिर धर्मांतरण करून घेण्याचा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये सुरू होता.

नागपूर: गोरगरिबांना आमिष दाखवून धर्मांतरण करणाऱ्या रॅकेटमधील तिघांना उत्तरप्रदेश एटीएसने (दहशतवाद विरोधी पथक) शुक्रवारी मध्यरात्री ताब्यात घेतले. कौसर आलम शौकत अली खान, प्रसाद रामेश्वर कांबळे आणि भूप्रियबंदो देवीदास मानकर, अशी या तिघांची नावे आहेत. ते गणेशपेठ परिसरात लपूनछपून वावरत होते. कांबळे हा मुळचा नागपुरातील रहिवासी आहे. कौसर धनबाद, लोहिचारा (झारखंड) येथील तर भूप्रियबंदो हा चामोर्शी (जि. गडचिरोली) येथील रहिवासी आहे.

गोरगरिबांना पैशाचे आमिष दाखवून, त्यांच्या छोट्याछोट्या गरजा पूर्ण करून त्यांचे पद्धतशिर धर्मांतरण करून घेण्याचा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये सुरू होता. एक मोठे रॅकेट हे काम करत होते. गोमतीनगर पोलीस ठाण्यात धर्मांतरविरोधी कायद्याचा गुन्हा दाखल करून यूपी एटीएसने या रॅकेटचा भंडाफोड केला. रॅकेटमधील काहींना अटकही केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून या रॅकेटमधील काही जण नागपुरात लपून असल्याचे यूपी एटीएसला कळले होते. त्यामुळे एटीएसच्या पथकाने शुक्रवारी नागपूर गाठले. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन त्यांनी कारवाईसाठी मदत मागितली. 

यानंतर शुक्रवारी मध्यरात्री एटीएस आणि स्थानिक पोलिसांनी गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहुल कॉम्प्लेक्समध्ये छापा टाकला. येथे २०२ क्रमांकाच्या सदनिकेत लपून असलेल्या कौसर आलम, प्रसाद कांबळे आणि भूप्रियबंदोला जेरबंद केले. त्यांच्याकडून काही महत्वाची कागदपत्रे आणि काही वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत.कारवाईबाबत गोपनियता -या कारवाईबाबत कमालीची गोपनियता बाळगण्यात आली होती. शनिवारी दुपारी ही कारवाई चर्चेला आल्यानंतर एकच खळबळ उडाली. स्थानिक अधिकाऱ्यांनी याबाबत दुपारपर्यंत फारसे बोलण्यास टाळले होते.

टॅग्स :nagpurनागपूरraidधाडPoliceपोलिसMuslimमुस्लीम