शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक!... इस्त्रीचे चटके आणि विजेचा शॉक देऊन भाजप महिला पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 15:11 IST

चव्हाण यांना इस्त्रीचे चटके देऊन, शॉक देऊन नंतर त्यांना ठार मारण्यात आलं असावं असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. नालासोपारा पोलीस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा अज्ञात आरोपीविरोधात दाखल करण्यात आला आहे. 

नालासोपारा - भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या केल्याने नालासोपारा परिसरात खळबळ माजली आहे. भाजप महिला पदाधिकारी रुपाली चव्हाण (वय ३२)यांची हत्या करण्यात आली आहे. वसई-विरारच्या जिल्हा युवती सहप्रमुख म्हणून त्या कार्यरत होत्या. चव्हाण यांची हत्या दोन दिवसांपूर्वी झाली असल्याचा संशय वर्तवण्यात आला आहे. चव्हाण यांना इस्त्रीचे चटके देऊन, शॉक देऊन नंतर त्यांना ठार मारण्यात आलं असावं असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. नालासोपारा पोलीस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा अज्ञात आरोपीविरोधात दाखल करण्यात आला आहे. 

नालासोपारा पश्चिमेकडील तपस्या अपार्टमेंटच्या बी विंग़मध्ये रूम नंबर १०१ मध्ये रूपाली चव्हाण राहत होत्या. त्या घटस्फोटित होत्या. चव्हाण यांचे वडील जवळच राहत होते. त्या मूळच्या पुण्याच्या होत्या. दोन वर्षांपूर्वीच त्या नालासोपाऱ्यामध्ये राहायला आल्या होत्या. त्यांना 10 वर्षांचा मुलगा असून तो वडिलांकडे रहातो. चव्हाण यांनी एक दुकान घेतले होते आणि त्यात पादत्राणे विक्रीचा व्यवसाय सुरू करणार होत्या. आज चव्हाण यांच्या दुकानाचे उद्घाटन होणार होतं. मात्र त्या फोन रिसिव्ह करत नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी एकास घरी जाऊन पाहण्यास सांगितलं तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. त्यावेळी रुपाली यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. अंगावर धारदार शस्त्राच्या खुणा होत्या. दोन दिवसापूर्वी हत्या करण्यात आली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. चव्हाण यांच्या शरीरावर वार केले आहेत. इस्त्रीचे चटके आणि विजेचा शॉक ही दिल्याच संशय आहे. अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनBJPभाजपा