शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तेरा वर्षांच्या मुलाने मित्राचा खून करून जमिनीत गाडले, मैदानात खेळताना झालेला वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 05:55 IST

Crime News : लहान मुलाच्या खेळाच्या भांडणातून १३ वर्षांच्या मुलाने ११ वर्षांच्या मुलाचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना २९ जानेवारी रोजी दुपारी केळेवाडीमध्ये घडली होती.

पुणे - लहान मुलाच्या खेळाच्या भांडणातून १३ वर्षांच्या मुलाने ११ वर्षांच्या मुलाचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना २९ जानेवारी रोजी दुपारी केळेवाडीमध्ये घडली होती. कोथरूड पोलिसांनी १३ वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. मैदानात खेळत असताना झालेल्या वादात ढकलून दिल्यानंतर डोक्यावर पडून मुलगा जखमी झाला. घरचे रागवतील म्हणून त्या मुलाच्या डोक्यात आणखी दगड घालून त्याला अर्धा गाडल्याचे समोर आले होते. विश्वजित विनोद वंजारी (वय ११, रा. केळेवाडी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. विश्वजित हा २९ जानेवारी रोजी सायंकाळी खेळायला जातो, असे सांगून बाहेर गेला होता. त्यानंतर तो परत आला नव्हता. त्याच्या आई-वडिलांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. कोथरूड पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता. त्याच्या घरापासून सुमारे ५०० मीटरवर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मोकळ्या प्लॉटमध्ये दगडाने त्याचा मृतदेह झाकून ठेवल्याचे ३१ रोजी पोलिसांना आढळले होते. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला होता.कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मेघश्याम डांगे यानी सांगितले, मुलाचा कसून शोध सुरू होता. त्याचा मृतदेह आढळल्यानंतर डोक्याला मार लागल्यामुळे खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार आरोपीचा शोध सुरू होता. तपास करताना १३ वर्षांच्या मुलावर संशय निर्माण झाला. त्यानेच हा खून केल्याचे निष्पन्न झाले. विश्वजित व आरोपी अल्पवयीन मुलगा हा मित्र होते. दोघे एकत्र खेळायचे. त्या वेळी त्यांच्यात वादावादी होत होती. विश्वजित याने त्याला चिडविले. पकडापकडीत आरोपीने विश्वजितचे नाक दाबले. त्यानंतर त्याला धक्का दिला. त्या ठिकाणी असलेल्या विटांवर तो पडल्यामुळे डोक्याला गंभीर जखम झाली. त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. त्यामुळे आरोपी मुलगा घाबरला. घरचे रागावतील म्हणून त्याने आणखी एक दगड त्याच्या डोक्यावर टाकला. तो दिसू नये म्हणून त्याच्या अंगावर बाजूने दगडे रचली. त्या ठिकाणी सिंमेटचा राडारोडा टाकल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुलास ताब्यात घेतले असून त्याला बाल न्यायालयात हजर केले जाणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे