शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कारची काच फोडून अमेरिकेला चाललेल्या व्यक्तीची पासपोर्टची बॅग चोरट्यांनी पळवली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 20:32 IST

Crime news : वाशी येथे राहणाऱ्या कुटुंबासोबत सोमवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

ठळक मुद्देवाशी पोलीसांनी कौशल्य पणाला लावून चोरट्यांचा मागोवा घेत त्यांनी महापे परिसरात फेकलेल्या बॅगचा शोध घेऊन त्यांचे पासपोर्ट मिळवून दिले. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून लॅपटॉप चोरणाऱ्यांचा शोध सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. 

नवी मुंबई : नोकरी निमित्ताने अमेरिकेला चाललेल्या व्यक्तीची पासपोर्ट ठेवलेली बॅग चोरटयांनी पळवल्याची घटना सोमवारी रात्री वाशीत घडली. विमानाच्या तीन तास अगोदर हा प्रकार घडल्याने त्यांचा प्रवास रद्द होण्याची वेळ आली होती. मात्र वाशी पोलीसांनी कौशल्य पणाला लावून चोरट्यांचा मागोवा घेत त्यांनी महापे परिसरात फेकलेल्या बॅगचा शोध घेऊन त्यांचे पासपोर्ट मिळवून दिले. 

वाशी येथे राहणाऱ्या कुटुंबासोबत सोमवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या कुटुंबातील काही व्यक्ती नोकरी निमित्ताने अमेरिकेला चालल्या होत्या. मंगळवारी पहाटे २ वाजता त्यांच्या विमानाचे उड्डाण असल्याने रात्री ९ वाजता ते वाशी सेक्टर १२ येथील हॉटेल मध्ये जेवायला बसले होते. सुमारे अर्धा तासाने ते रस्त्यालगत उभ्या केलेल्या कार जवळ आले असता, कारची मागच्या बाजूची काच फुटल्याचे आढळून आले. शिवाय कार मध्ये ठेवलेली लॅपटॉची बॅग देखील आढळून आली नाही. या बॅग मध्ये त्यांचे पासपोर्ट व व्हिजा शिवाय प्रवासासाठी लागणारी इतर आवश्यक कागदपत्रे होती. त्यामुळे या कुटुंबावर अमेरिका वारी रद्द होण्याची वेळ आली होती. या घटनेबाबत त्यांनी वाशी पोलीसांना कळवले असता वरिष्ठ निरीक्षक रमेश चव्हाण यांनी तात्काळ ४ ते ५ पथके तयार केली होती. या पथकांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातले सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये चोरटे ज्या दिशेने गेले त्या मार्गावरून पोलीस त्यांच्या मागे धावू लागले.

अखेर सुमारे एक तासाच्या पाठलागानंतर महापे येथे रस्त्यालगत त्यांना चोरटयांनी चोरलेली बॅग फेकलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलीसांनी या बॅगची झडती घेतली असता त्यात सदर कुटुंबाचे पासपोर्ट व इतर सर्व कागदपत्रे आढळून आली. चोरट्याने त्यामधील लॅपटॉप घेऊन ती बॅग त्याठिकाणी टाकुकन दिली होती. तर पोलीसांनी कार्यतत्परता दाखवत चोरट्यांचा मागोवा घेतल्याने हि बॅग हाती लागली व पुढील काही मिनिटात या कुटुंबाने विमानतळाकडे धाव घेतली. हे कुटुंब वेळेत विमानतळावर पोचल्याने त्यांना नियोजित विमान देखील मिळाल्याचे वरिष्ठ निरीक्षक रमेश चव्हाण यांनी सांगितले. तर या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून लॅपटॉप चोरणाऱ्यांचा शोध सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबईRobberyचोरीAmericaअमेरिकाpassportपासपोर्टcarकार