शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

साई मंदिरातील वाॅचमनची नजर चुकवत चोरट्यांनी दानपेट्यांवर मारला डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 19:13 IST

Robbery Case : घटनास्थळी श्वान पथक, फिंगर प्रिंट पथकाने भेट देत पाहणी केली आहे. चाेरट्यांच्या शाेधासाठी पाेलीस पथके काम करत आहेत. पहाटे २ ते ५ दरम्यान, चाेरट्यांनी मंदिरातील दानपेट्या फाेडल्या आहेत.

लातूर : शहरातील विशाल नगरात असलेल्या साई मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये रात्रीच्या घडमाेडी, हालचाली स्पष्ट दिसून येत नसल्याने, चाेरट्यांनी मंदिरातील दाेनही दानपेट्या फाेडण्याचे धाडस केले आहे. काेराेनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर नियम शिथील करण्यात आले हाेते. परिणामी, मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांची माेठ्या प्रमाणावर गर्दी हाेत हाेती. मंदीर दर्शनासाठी खुले झाले तरी दानपेट्या उघडण्यात आल्या नव्हत्या. नेमकी कितीची राेकड चाेरट्यांनी पळविले, हे स्पष्टपणे सांगता येणार नाही.मंदिरातील वाॅचमनची नजर चुकवत डल्ला...मंदिर समितीच्या वतीने सुरक्षेसाठी वाॅचमन नियुक्त करण्यात आला आहे. मात्र, ताे आतल्या खाेलीत झाेपल्याची माहिती पाेलिसांनी दिली. वाॅचमनच्या हालचालींवर नजर ठेवत, त्यांची नजर चुकवत चाेरट्यांनी दाेन्ही दानपेट्यांवर डल्ला मारला आहे. चाेरट्यांनी दानपेट्यातील केवळ नाेटाच लंपास केल्या आहेत. तर नाण्यांना मात्र त्यांनी हात लावला नाही. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली असावी, असा अंदाज पाेलिसांनी वर्तविला आहे.श्वान, फिंगर प्रिंट पथकाकडून पाहणी...घटनास्थळी श्वान पथक, फिंगर प्रिंट पथकाने भेट देत पाहणी केली आहे. चाेरट्यांच्या शाेधासाठी पाेलीस पथके काम करत आहेत. पहाटे २ ते ५ दरम्यान, चाेरट्यांनी मंदिरातील दानपेट्या फाेडल्या आहेत. एमआयडीसी पाेलिसांची व्हॅन १ ते २ वाजण्याच्या सुमारास गस्तीवर हाेती. पाेलीस आणि वाॅचमनची नजर चुकवत चाेरट्यांनी ही चाेरी केली आहे.

टॅग्स :RobberyचोरीTempleमंदिरlaturलातूरCrime Newsगुन्हेगारीcctvसीसीटीव्ही