शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांनी पोलिसासह आणखी एकाचे घर फोडले; ६ ते ७ लाखांची जबरी चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 22:32 IST

Crime News : दिवसाढवळ्या चोरट्यांनी जबरी चोरी करीत, पोलिसांना आव्हान दिले आहे.

अकोला: तीन चोरट्यांनी अपार्टमेंटमधील दोन घरे फोडून सोने, चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा ८ ते १० लाख रूपयांचा ऐवज लांबविल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यापैकी एक फ्लॅट एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याचा आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास गीता नगरात घडली. याप्रकरणात जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दिवसाढवळ्या चोरट्यांनी जबरी चोरी करीत, पोलिसांना आव्हान दिले आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत कर्मचारी सुभाष दंदी यांच्या तक्रारीनुसार गीता नगरातील भानु अपार्टमेंट ते राहत असून, बुधवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घरी परतले असता, त्यांना घरात तीन चोरटे दिसून आले, त्यांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केलाय. मात्र चोरट्यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवित पळ काढला. 

या दरम्यान पोलीस कर्मचारी सुभाष दंदी यांची घरात आणि खाली रस्त्यावर चोरट्यांमध्ये हाणामारी झाली. त्यांनी आरडाओरड केली असता, नागरिक गोळा झाले. मात्र तोपर्यंत त्यांना चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत पळ काढला. दंदी यांच्या घरातून तीन लाख रूपयांचा ऐवजावर हात साफ सांगितले जात आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनांमुळे गीता नगर परिसरातील नागरिक भयभित झाले आहेत.

दुसऱ्या घरातून ऐवज लंपासविजय त्र्यंबक गोपनारायण यांच्या तक्रारीनुसार बुधवारी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या दोन्ही मुली शिकवणी वर्गाला गेल्या होत्या आणि पत्नी ज्योती या भाजी बाजारात गेल्या होत्या. त्या ५.३० वाजता परतल्या. यादरम्यान एका तासात चोरट्यांनी त्यांच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि कपाटात ठेवलेले चांदीचे दागिने आणि तीन ते चार हजार रुपये रोख लंपास केला.

पोलीस कर्मचाऱ्यासोबत हाणामारीपोलीस कर्मचारी दंदी हे घरी परतल्यावर त्यांना घरात तीन चोरटे चोरी करीत असल्याचे दिसून आले. त्यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, चोरट्यांच्या हातात चाकू असल्याने, त्यांना प्रतिकार करता आला नाही. चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. दंदी यांनी त्यांचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्यात हाणामारीही झाली. परंतु चाकूमुळे चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.

टॅग्स :AkolaअकोलाThiefचोरCrime Newsगुन्हेगारी