शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

नागपुरात  पुजाऱ्याच्या घरात चोरट्याने साधला डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 8:48 PM

ठिकठिकाणी पूजापाठ करणाऱ्या एका पुजाऱ्याच्या घरात शिरलेल्या चोरट्यांनी दोन लाखांची रोकड तसेच सोन्याचे दागिने लंपास केले. शुक्रवारी भरदुपारी घडलेल्या या धाडसी घरफोडीच्या घटनेमुळे लकडगंज परिसरात एकच खळबळ उडाली होती.

ठळक मुद्दे दोन लाखांची रोकड लंपास : लकडगंजमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ठिकठिकाणी पूजापाठ करणाऱ्या एका पुजाऱ्याच्या घरात शिरलेल्या चोरट्यांनी दोन लाखांची रोकड तसेच सोन्याचे दागिने लंपास केले. शुक्रवारी भरदुपारी घडलेल्या या धाडसी घरफोडीच्या घटनेमुळे लकडगंज परिसरात एकच खळबळ उडाली होती.जिगनिश राजेश दवे (वय २६) असे फिर्यादीचे नाव आहे. ते लकडगंजच्या बाबुलवन पाण्याच्या टाकीजवळ राहतात. ते पूजापाठ करतात. नुकतेच त्यांच्या बहिणीचे लग्न झाले. त्यामुळे अनेकांचे देणे चुकविण्यासाठी त्यांनी आपल्या घरात बँकेतून रक्कम आणून ठेवली होती. शुक्रवारी दुपारी १ वाजता त्यांची आई आणि बहीण रुग्णालयात गेल्या. तर, ते सलूनमध्ये गेले होते. एक-दीड तासात ते परतले तेव्हा त्यांना त्यांच्या दाराचे कुलूप तुटलेले दिसले. चोरट्याने पार्किंगच्या दारावरून उडी मारून आत प्रवेश केला. घराच्या दाराचे कुलूप तोडले अन् शयनकक्षातील कपाटात ठेवलेले रोख २ लाख आणि सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख, १० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. या धाडसी घरफोडीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून लकडगंजच्या एपीआय राखी गेडाम यांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्याचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :theftचोरीnagpurनागपूर