उल्हासनगरात तरुणावर घरात जीवघेणा हल्ला आरोपी गजाआड

By सदानंद नाईक | Updated: January 7, 2023 15:47 IST2023-01-07T15:46:27+5:302023-01-07T15:47:19+5:30

उल्हासनगर कॅम्प नं-३ कुर्ला कॅम्प परिसरात गुरू गोविंद पॅलेस इमारतीच्या पहिल्या मजल्यावर बंटी वाधवानी कुटुंबासह राहतात.

thief knife attack on young man at home in Ulhasnagar, arrested | उल्हासनगरात तरुणावर घरात जीवघेणा हल्ला आरोपी गजाआड

उल्हासनगरात तरुणावर घरात जीवघेणा हल्ला आरोपी गजाआड

उल्हासनगर : चोरीचा उद्देशाने घरात घुसलेल्या इसमाने घरमालक बंटी वाधवानी यांच्यावर शुक्रवारी सकाळी चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. वाधवानी यांनी आरडाओरडा केल्याने, जीव वाचला असून इमारतीत लपलेल्या महेश ठारवानी याला विट्ठलवाडी पोलिसांनी अटक केली. 

उल्हासनगर कॅम्प नं-३ कुर्ला कॅम्प परिसरात गुरू गोविंद पॅलेस इमारतीच्या पहिल्या मजल्यावर बंटी वाधवानी कुटुंबासह राहतात. शुक्रवारी कुटुंब बाहेर गेल्यावर, घरी एकटे असलेले बंटी हे सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान किचन रुम मध्ये जूस बनवीत होते. त्यावेळी त्यांना बेडरूम मधून काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने, त्यांनी बेडरूमकडे धाव घेतली. त्यावेळी त्यांना एक इसम बेडरूम मध्ये वेषांतर करून दिसला. त्याला पकडण्यासाठी आरडाओरडा केली असता, आरोपी असलेला महेश ठारवानी याने बंटी यांच्या हातातील जूस करण्याचा चाकू हिसकावून घेत संपूर्ण शरीरावर सपासप वार केले. आरडाओरडा झाल्याने, इमारतीच्या वॉचमनने गेट बंद करून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याला फोन करून घटनेची माहिती दिली. काही मिनिटात पोलीस पथक येऊन, त्यांनी चोरट्याचा शोध घेतला असता पाचव्या मजल्यावर लपून बसलेल्या असवस्थेत महेश ठारवानी हा मिळून आला. 

विठ्ठलवाडी पोलिसांनी महेश ठारवानी याला अटक करून जखमी झालेल्या बंटी वाधवानी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली. महेश ठारवानी याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणी विट्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: thief knife attack on young man at home in Ulhasnagar, arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.