शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

ऐकावं ते नवलच! ट्रकचा ईएमआय भरण्यासाठी त्यांनी चोरले कांदे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 10:54 IST

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात कांद्याचे भाव कमालीचे भडकले आहेत. कांद्याला चांगला दर मिळत असल्याने आता कांदा चोरून नेण्याचेही प्रकार घडत आहेत.

बंगळुरू - गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात कांद्याचे भाव कमालीचे भडकले आहेत. कांद्याला चांगला दर मिळत असल्याने आता कांदा चोरून नेण्याचेही प्रकार घडत आहेत. असाच एक कांदे चोरीचा प्रकार बंगळुरूमध्ये समोर आला आहे. बंगळुरूमध्ये गाडीचा ईएमआय भरण्यासाठी एक ट्रक ड्रायव्हर आणि कर्मचाऱ्यांनी सुमारे 9 लाख रुपये रुपये किमतीचे कांदे चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, चोरीचा प्रकार लपवण्यासाठी या आरोपींनी अपघाताची खोटी कहाणीही ऐकवली मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच या सर्व आरोपींनी गुन्हा कबूल केला. बंगळुरूमधील एक ट्रक ड्रायव्हर आणि इतर काही कर्मचाऱ्यांनी गाडीचा ईएमआय भरण्यासाठी कांदे चोरीचा बनाव रचला. त्यासाठी त्यांनी कांदे वाहतूक करत असलेल्या ट्रकचा अपघात झाल्याचे नाट्य रचले. तसेच या ट्रकमधून कांद्याच्या 81 गोण्या उतरवून शहरातील बाजारात जाणाऱ्या एका वाहनातून रवाना केल्या होत्या. दरम्यान, तवारकेरे पोलीस ठाण्यातील महिला सब-इन्स्पेक्टरांना संबंधित ट्रकचालकाने दिलेल्या माहितीवर शंका आली. रात्री गस्तीवर असताना अपघातस्थळावर कुठलाही ट्रक नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी ट्रकचालक आणि इतरांची कसून चौकशी केली. त्यानंतर या सर्वांना ताब्यात घेतले. ट्रक ड्रायव्हर संतोषकुमार आणि चेतन यांनी आपण जाणूनबुजून ट्रकला अपघात घडवून आणल्याचे मान्य केले. या प्रकरणी कांद्यांचे व्यापारी शेख अली आणि त्यांच्या दोन मुलांनाही अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य संशयित असलेला ट्रकमालक अद्याप फरार आहे. ट्रकचे थकीत कर्ज फेडण्यासाठी त्याने अपघाताचे नाटक रचले असावे, अशी पोलिसांना शंका आहे.   याबाबत अधिक  माहिती देताना तपास अधिकाऱ्याने सांगितले की, ट्रकमालकाने आपले ड्रायव्हर आणि व्यापारी अलीची मदत करण्यासाठी ही योजना आखली होती. अपघात झाल्यानंतर ट्रकच्या दुरुस्तीसाठी विम्यावर दावा करता येईल, असा त्याचा विचार होता. मात्र आनंद कुमार या शेतकऱ्याने केलेल्या तक्रारीनंतर या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी चोरलेल्या कांद्याच्या गोण्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रक ड्रायव्हरला फोन केला आणि कांदे ताब्यात घेत संबंधित शेतकऱ्याला परत केले.  

टॅग्स :onionकांदाCrime Newsगुन्हेगारीBengaluruबेंगळूर