शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
3
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
4
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
5
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
6
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
7
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
9
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
11
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
12
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
13
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
14
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
15
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
16
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
17
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
18
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
19
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
20
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

पैशासाठी त्यांनी मालकाचाच केला खून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 2:44 PM

डाेक्यावर खूप कर्ज असल्याने तिघांनी अापल्या मालकाचाच खून केल्याची धक्कादायक घटना समाेर अाली अाहे. पाेलिसांनी अाराेपींना अटक केली अाहे.

पुणे : पैशासाठी त्यांनी आपल्याच मालकाचे अपहरण केले त्याच्याकडून २ लाख रुपये घेऊन त्याचा खून केल्याची घटना यवत पोलिसांनी उघडकीस आणली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्याचा एक साथीदार फरार आहे. 

    हनुमंत निवृत्ती थोरात (वय ४५, रा़ खुटबाब, ता़ दौंड) असे खून झालेल्याचे नाव आहे. सुरज उर्फ पप्पू सुभाष ओहोळ ( वय २८, सध्या रा. आनंदग्राम सोसायटी, वाखारी, ता.दौंड, मूळ रा.पिसोरे खांड, ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर), रावसाहेब साहेबराव फुलमाळी ( वय ३०, सध्या रा.जुना एस.टी.स्टॅन्ड, पेडगाव, ता.श्रीगोंदा, ता.अहमदनगर. मूळ रा.घोडेगाव, चांदा, ता.नेवासा, जि.अहमदनगर) आणि छकुली सुरज उर्फ पप्पू ओहोळ ( वय.23, सध्या रा. आनंदग्राम सोसायटी, वाखारी, ता.दौंड, जि.पुणे. मूळ रा.पिसोरे खांड, ता.दौंड, जि.अहमदनगर.)  अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बापू भोईटे ( रा.श्रीगोंदा, ता.अहमदनगर) हा फरार आहे. सूरज ओहोळ याच्याकडून एक गावठी कट्टा व जीवंत काडतुस जप्त केले आहे.  

    याबाबत पोलिसांनी सांगितले की, खुटबाव येथील व्यावसायिक हनुमंत भोरात हे आपल्या पांढऱ्या मोटारीसह ५ सप्टेंबरपासून बेपत्ता असल्याची तक्रार यवत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती़. त्याविषयी संशय आल्याने यवत पोलिसांनी  त्याचा तपास करु केला़ त्यांच्या पांढऱ्या मोटारीचा फोटो सोशल मिडियावर टाकण्यात आला, तेव्हा १० सप्टेंबर रोजी एकाने ही मोटार हडपसर येथील मंत्री मार्केटजवळ पार्क केली असल्याचे कळविले़ त्यानुसार पोलिसांनी ती मोटार ताब्यात घेतली.     थोरात यांच्या जे सीबी  मशीनवर चालक असणारा सूरज ऊर्फ पष्पू सुभाष ओहोळ याचा संशय आल्याने व तो अहमदनगर येथील राशीन येथे येणार असल्याचे समजल्याने पोलिसांनी त्याना ताब्यात घेतले. त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने आपण मित्रांच्या मदतीने हा खून केल्याचे कबुल केले. ओहोळ, रावसाहेब फुलमाळी, बाप्पू भोईटे या तिघांवर खूप कर्ज झाले होते त्यांना पैशांची खूप गरज होती़ म्हणून त्यांनी हनुमंत थोरात यांचे ५ सप्टेंबर रोजी आनंदग्राम सोसायटीतून गाडीसह अपहरण केले. त्यांचे तोंड, हाथ पाय बांधून त्यांच्याकडून २ लाख रुपये घेऊन त्यांचा खून केला. दुुसऱ्या दिवशी ६ सप्टेंबरला पहाटे पाटस येथील नवा मुठा उजवा कालवा येथे त्यांचा मृतदेह पाण्यात टाकून दिला व हडपसर येथील मंत्री मार्केट येथे गाडी लावून ते पळून गेले.

    ही हकिकत समजल्यावर पोलीस पथक व थोरात यांचे नातेवाईक यांनी १५ सप्टेबरला पाटस येथील नवा मुठा उजव्या कालव्याच्या कडेने शोध घेतला असता बारामतीच्या शिरसुफळ तलावाच्या कडेला कॅनॉलमध्ये एक मृतदेह आढळून आला. तो थोरात यांचाच असल्याचे नातेवाईकांनी ओळखले. पोलीस निरीक्षक सूरज बंडगर, सहायक पोलीस निरीक्षक विनायक देवकर, सहायक फौजदार जिजाराम वाजे, रमाकांत गवळी, पोलीस नाईक संदीप कदम, गणेश पोटे, सुरेश दडस, दीपक पालखे, गणेश झरेकर, अभिजीत कांबळे, महेश बनकर. रंजीत निकम, दशरथ बनसोडे, सिमा आबनावे, पोलीस कॉन्स्टेबल संपत खबाले, विनोद रासकर, विशाल गजरे, हेमंत कुंजीर, प्रशांत कर्णावर यांनी ही कामगिरी केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेMurderखूनnewsबातम्या