शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 17:04 IST

मालगाडी येण्यापूर्वी दोघेही एकमेकांचा हात पकडून होते आणि ट्रेन जवळ येत असताना एकमेकांना मिठी मारून रडत होते.

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे प्रेमसंबंधातून एका तरुण-तरुणीने मालगाडीखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लोकांनी त्यांना थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणाचेही ऐकले नाही आणि रेल्वेसमोर उडी मारून आपला जीव दिला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून, आत्महत्येच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मुरादाबादच्या बिलारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मालगाडी येण्यापूर्वी दोघेही एकमेकांचा हात पकडून होते आणि ट्रेन जवळ येत असताना एकमेकांना मिठी मारून रडत होते. भरधाव वेगाने येणाऱ्या मालगाडीच्या लोको पायलटने त्यांना बाजूला होण्याचा इशारा दिला आणि अनेकवेळा हॉर्नही वाजवला, मात्र ते रुळावरून बाजूला झाले नाहीत. ट्रेनखाली आल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहाचे पाच तुकडे झाले होते.

मृतक तरुण सुशांत आणि तरुणी आशी दोघेही बिलारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सैफपूर जगन गावाचे रहिवासी होते. सुशांत मुरादाबादमध्ये आपल्या मोठ्या भावासोबत राहून एका फॅक्टरीत नोकरी करत होता आणि काही दिवसांपूर्वीच तो गावी आला होता. तर, आशीने याच वर्षी १२वीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. गुरुवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास दोघेही घरात कोणालाही न सांगता मुरादाबाद-चंदौसी रेल्वे लाईनजवळ पोहोचले, जिथे त्यांनी एकत्र आत्महत्या केली.

कुटुंबीयांची चौकशी सुरूमुरादाबाद पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, मृतांचे शरीर पाच तुकड्यांमध्ये आढळले असून, ते ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे. प्राथमिक तपासानुसार, हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसत आहे. शवविच्छेदन अहवालानंतर या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, प्रेमसंबंधातून घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहार