शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पीपीई सूट घालून आले अन् सुकामेवा घेऊन गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 17:06 IST

चोरट्यांनी फोडले मॉल : तीच अल्टो कार सीसीटीव्हीत कैद

ठळक मुद्देअल्टोकारधारक पीपीई सुटमधील या भुरट्या चोरट्यांनी नाशिक पोलिसांना चांगलेच आव्हान दिले आहे. मॉलमधून चोरट्यांनी सुकामेवा व दोन हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचे आढळून आले आहे.

पंचवटी : गेल्या आठवड्यात पीपीई सूट परिधान करून आलेल्या चोरट्यांनी सराफी दुकाने फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असताना सोमवारी पहाटेच्या सुमाराला मेरी अमृतधाम लिंक रोडवर असलेल्या एका मॉलचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. यावेळीसुद्धा ओळख पटू नये म्हणून चोरट्यांनी पीपीई सूट घातलेला असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. चोरटे अल्टो कारमधून आल्याचे फुटेजमधून स्पष्ट होते. अल्टोकारधारक पीपीई सुटमधील या भुरट्या चोरट्यांनी नाशिकपोलिसांना चांगलेच आव्हान दिले आहे. मॉलमधून चोरट्यांनी सुकामेवा व दोन हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचे आढळून आले आहे.

 

मेरी अमृतधाम लिंक रोडवरील वरदविनायक मंदिराजवळ  आकाश शांताराम बोंडे यांच्या मालकीचे हाय स्ट्रीट मार्ट  मॉल आहे. सोमवारी पहाटेच्या वेळी एका राखाडी रंगाच्या अल्टो कारमधून आलेल्या चौघा संशयितांना पैकी तिघांनी काहीतरी लोखंडी वस्तूच्या सहाय्याने शटर उचकटून दुकानात प्रवेश करत त्यांनी दुकानातील गल्ला तसेच काजू बदाम असलेले ड्रायफूटचे तीन ते चार पाकीट चोरी केले. दुकानातील गल्यात अंदाजे  तीन हजार रुपयांची रोकड होती तसेच 6 ते 7 हजार रुपयांचे ड्रायफूट असा जवळपास अंदाजे दहा हजार रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे फरार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

पहाटेच्या सुमारास सुरक्षरक्षक मॉलच्या मागील बाजूस झोपलेला असताना चोरट्यानी संधी साधून चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे सदर घटनेचे वृत्त कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय वानखेडे, हवालदार संदीप शेळके, नितीन जगताप आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. चोरीबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यत आला आहे. भुरटे चोर हिरावाडीतील?काही दिवसांपूर्वी म्हसरूळ शिवारात असलेल्या एका देशी-विदेशी दारू दुकानातून हजार रुपयांची रोकड चोरणारे संशयित व मेरी अमृतधाम लिंक रोडवरील मॉलमध्ये चोरी करणारे संशयित यांनी पांढऱ्या रंगाचा पीपीई सूट घातल्याने दोघा घटनेतील संशयित यांचे वर्णन मिळतेजुळते असून सदरचे चोरटे हे हिरावाडी परिसरातीलच भुरटे चोर असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. तसेच अशाच पद्धतीने काही दिवसांपूर्वी भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील टाकळीरोडवर सराफी दुकान फोडणारे चोरट्याचे वर्णन व गुन्हयाची पद्धत एकसारखी असल्याचे आढळून येते.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

लज्जास्पद! चहा करण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीच्या गुप्तांगात टाकली मिरची पावडर

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिसNashikनाशिकPPFपीपीएफ