शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार झाला नाही, तोल जाऊन रेल्वेतून पडली 'ती' तरुणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 21:33 IST

Crime News : वाशी खाडीपुलावर रुळालगत आढळली होती

ठळक मुद्देवैद्यकीय अहवालात तिच्यावर बलात्काराची शक्यता वर्तवली गेल्याने पोलिसांनी तपासावर जोर दिला होता.

नवी मुंबई - रेल्वेरुळालगत जखमी अवस्थेत आढळलेल्या त्या तरुणीवर बलात्कार झाला नसल्याचे उघड झाले आहे. सहा दिवसांनी ती शुद्धीत आल्यावर रेल्वेपोलिसांना घटनेचा उलगडा झाला. वैद्यकीय अहवालात तिच्यावर बलात्काराची शक्यता वर्तवली गेल्याने पोलिसांनी तपासावर जोर दिला होता.वाशी मानखुर्द दरम्यान खाडी पुलालगत सुमारे 25 वर्षीय अज्ञात तरुणी जखमी अवस्थेत आढळली होती. सकाळी  सहा वाजण्याच्या सुमारास ती रुळालगत पडली असल्याची माहिती वाशी रेल्वे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डोक्यावर मार लागल्याने ती जखमी अवस्थेत होती. यामुळे सखोल तपास करून पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांची माहिती मिळवून तिची ओळख पटवली होती. यादरम्यान वैद्यकीय चाचणीत तिच्यावर बलात्कार झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यावरून अज्ञात व्यक्तींनी तिच्यावर बलात्कार करून रेल्वेतून फेकून दिल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून तपासावर जोर दिला होता. याकरिता ट्रान्स हार्बर व हार्बर मार्गावरील रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही देखील तपासण्यात आले. मात्र कसलाही सुगावा पोलिसांच्या हाती लागला नव्हता. यामुळे जखमी तरुणी शुद्धीवर येण्याची प्रतीक्षा पोलीस करत होते. अखेर सात दिवसांनी सोमवारी ती शुद्धीवर आली असता, तोल जाऊन आपण रेल्वेतून पडल्याची कबुली तिने दिल्याचे वाशी रेल्वे पोलिसठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विष्णू केसरकर यांनी सांगितले. 

सदर तरुणी हि मुंबईची राहणारी असून त्याच परिसरात नोकरी करणारी आहे. घटनेच्या एक दिवस अगोदर तिचे मित्रांसोबत भांडण झाले होते. यावरून ती तणावात रेल्वेतून फिरत नवी मुंबईत येत होती. यादरम्यान ती लोकलच्या दरवाजात उभी असताना खाडीपूल लगत तोल जाऊन खाली पडली होती. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ती बेशुद्ध झाली होती. मात्र वैद्यकीय अहवालात समोर आलेल्या बाबीवरून तिच्यावर अतिप्रसंग झाल्याची शक्यता वर्तवली गेल्याने, न घडलेल्या घटनेच्या तपासावर पोलिसांना जोर द्यावा लागला.

टॅग्स :Rapeबलात्कारNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिसrailwayरेल्वेMedicalवैद्यकीय