शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

'सिद्धू मुसेवालाची हत्या करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता'; गोल्डी ब्रारने सांगितले हत्या करण्याचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 18:09 IST

गायक सिंद्दू मुसेवाला हत्या प्रकरणात गोल्डी ब्रार पहिल्यांदाच बोलला. त्याने भारतातील न्याय व्यवस्थेबद्दलची नाराजी व्यक्त करत मुसेवालाची हत्या करण्याचे कारणही सांगितले.

Goldy Brar on Sidhu Moose Wala: पंजाबी हिप-हॉप स्टार सिद्धू मुसेवालाची दोघांनी गोळ्या घालून हत्या केली होती. ही हत्या इतकी भयंकर होती की, तिने देशभरात खळबळ माजली होती. सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर गोल्डी ब्रारने घेतली होती. त्याने तशी पोस्ट फेसबुकवर टाकली होती. पण, तीन वर्ष लोटली तरी गोल्डी ब्रार ठिकाणा सापडलेला नाही. अशातच बीबीसीने गोल्डी ब्रारशी संपर्क करत या प्रकरणावर त्याची भूमिका जाणून घेतली. गोल्डी ब्रारने सिद्धू मुसेवालाबद्दल बोलताना त्याला मारण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता असे सांगितले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

बीबीसीने यासंदर्भात एक रिपोर्ट दिला आहे. बीबीसीने गोल्डी ब्रारशी संपर्क झाल्यानंतर त्याला प्रश्न विचारला की, सिद्धू मुसेवालाची हत्या कशी आणि का केली?

गोल्डी ब्रारने सांगितले सिद्धू मुसेवालाच्या हत्येचे कारण

गोल्डी ब्रार म्हणाला, "त्याला अंहकार झाला होता. गर्वाच्या भरात त्याने अशा काही चुका केल्या की, त्या माफ केल्या जाऊ शकत नव्हत्या."

वाचा >>राजा रघुवंशीच्या घरी गेला आरोपी सोनमचा भाऊ, म्हणाला- माझ्या बहिणीला फाशी द्या

"त्याची हत्या करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्याला त्यांच्या कर्माचे फळ भोगावेच लागणार होते. एकतर तो राहिला असता नाहीतर आम्ही. ही इतकी सरळ गोष्ट आहे", असे गोल्डी ब्रार म्हणाला. 

बिश्नोई सिद्धूला पाठवायचा मेसेज

ब्रारने सांगितले की, "लॉरेन्स (बिश्नोई) सिद्धू मुसेवालाच्या संपर्कात होता. मला माहिती नाही की, त्यांची ओळख कुणी करून दिली होती. मी कधी विचारलंही नाही. पण, ते एकमेकांशी बोलायचे. लॉरेन्सला खुश ठेवण्यासाठी सिद्धू गुड मॉर्निंग आणि गुड नाईट असे मेसेज पाठवायचा."

पहिला वाद कधी झाला होता?

ब्रार सिद्धू मुसेवालासोबतच्या वादाबद्दलही सांगितले. तो म्हणाला, "पहिला वाद मुसेवाला भारतात आल्यानंतर झाला होता. त्याची सुरुवात पंजाबमधील एका गावात झालेल्या कबड्डीच्या सामन्यात झाली होती. मुसेवालाने या कबड्डी स्पर्धेचा प्रचार केला होता. ही स्पर्धा बिश्नोई विरोधी बंबीहा गँगने आयोजित केलेली होती."

"हा तोच गाव आहे, जिथे आमचे सगळे विरोधक आहे. तो आमच्या विरोधकांना ताकद देत होता. त्यामुळे लॉरेन्स आणि इतर लोक त्यांच्यावर नाराज झाले. त्यांनी सिद्धूला धमकी दिली होती की तुला आम्ही सोडणार नाही. २०२१ मध्ये मोहालीत एका पार्किंगमध्ये गँगच्या लोकांनी विक्की मिद्दूखेडाची हत्या केली होती. तेव्हापासून बिश्नोईचे सिद्धू मुसेवालासोबत वैर वाढले होते", असेही गोल्डी ब्रारने सांगितले.

सिद्धू मुसेवाल्याबद्दल सगळ्यांना माहिती होतं 

ब्रार म्हणाला की, "मी पुरावे तर देऊ शकत नाही. पण, मला पूर्ण खात्री आहे की, मिद्दुखेडाच्या हत्येमध्ये सिद्धू मुसेवालाचाही हात होता. सिद्धूची भूमिका सगळ्यांना माहिती होती. तपास करणारे पोलीस, पत्रकार यांना त्याच्याबद्दल माहिती आहे. सिद्धू राजकारणी आणि सत्तेतील लोकांशी मिळलेला होता. तो राजकीय ताकद आणि इतर शक्तींचा वापर आमच्याविरोधी गटाला मदत करण्यासाठी करत होता."

"आमची इच्छा होती की, सिद्धू मुसेवालाला त्याने जे केले त्याची शिक्षा मिळावी. त्याच्यावर खटला भरला जावा. त्याला तुरुंगात पाठवावे. पण, कुणीच आमचे ऐकले नाही. त्यामुळे आम्ही याची जबाबदारी स्वतःवर घेतली. जेव्हा बधिर कानांना सौजन्याने सांगितली गोष्ट ऐकायला येत नाही, तेव्हा गोळीचाच आवाज ऐकू जातो", असे गोल्डी ब्रार म्हणाला. 

मला कसलाही पश्चाताप नाही

गोल्डी ब्रार म्हणाला, "कायदा. न्याय. यासारख्या कोणत्याही गोष्टी नाहीत. फक्त शक्तिशाली लोकच न्याय मिळवू शकतात. आमच्यासारखे सामान्य माणसं नाही. विक्की मिद्दूखेडाचा भाऊ राजकारणात होता. पण, त्याला न्यायासाठी संघर्ष करावा लागला. मी जे केले आहे, ते मी माझ्या भावासाठीही केले असते. मला याचा कसलाही पश्चाताप नाहीये", असे गोल्डी म्हणाला. 

टॅग्स :Sidhu Moosewalaसिद्धू मूसेवालाCrime Newsगुन्हेगारीPunjabपंजाबCelebrityसेलिब्रिटीPoliceपोलिस