शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पासवर्डवरून भांडण झाले, पत्नीने पतीला जिवंत जाळले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 12:29 IST

गेल्या काही काळामध्ये किरकोळ कारणांवरून पती आणि पत्नीमध्ये होत असलेली भांडणे विकोपाला जात असल्याचे चित्र आहे. असाच एक प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देगेल्या काही काळामध्ये किरकोळ कारणांवरून पती आणि पत्नीमध्ये होत असलेली भांडणे विकोपाला जात असल्याचे चित्र आहेमोबाइलचा पासवर्ड न सांगितल्याने संतप्त झालेल्या पत्नीने पतीला जिवंत जाळल्याची घटना इंडोनेशियातील बाली येथे घडली

बाली (इंडोनेशिया) - गेल्या काही काळामध्ये किरकोळ कारणांवरून पती आणि पत्नीमध्ये होत असलेली भांडणे विकोपाला जात असल्याचे चित्र आहे. असाच एक प्रकार समोर आला आहे. मोबाइलचा पासवर्ड न सांगितल्याने संतप्त झालेल्या पत्नीने पतीला जिवंत जाळल्याची घटना इंडोनेशियातील बाली येथे घडली आहे. या घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या पतीचा मृत्यू झाला असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपासा सुरू केला आहे.डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार इंडोनेशियातील वेस्ट नुसा तेंगारा प्रांतामध्ये ही घटना घडली आहे. येथील इल्हाम चहयानी या महिलेने पती डेडी पूरनामासोबत घरात होती. यादरम्यान कोणत्या तरी विषयावरून त्यांच्यात वादास सुरुवात झाली. त्यानंतर इल्हाम हिने पतीकडे त्याच्या मोबाइल पासवर्डची मागणी केली. मात्र डेडी याने पासवर्ड देण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या इल्हाम हिने डेडीवर पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिले. या प्रकारानंतर घरातून उसळत असलेल्या आगीच्या ज्वाळा पाहून एका शेजाऱ्याने त्यांच्या घराकडे धाव घेतली. मात्र गंभीररीत्या जळालेल्या डेडीला वाचवणे शक्य झाले नाही. अखेर डेडी याने रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. दरम्यान, पोलिसांनी आरोपी पत्नीस ताब्यात घेतले आहे. पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून भांडण सुरू झाले होते. त्यानंतर संतापलेल्या पतीने पत्नीस मारहाण केली. त्यानंतर दोघांमध्ये पासवर्डवरून पुन्हा भांडण झाले. अखेरीस पत्नीने रागाच्या भरात पतीची हत्या केली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIndonesiaइंडोनेशिया