पत्नीने केला अमेरिकेचा हट्ट; पतीने फोडले पत्नीचे डोके
By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 13, 2023 14:34 IST2023-04-13T14:34:25+5:302023-04-13T14:34:36+5:30
पती सोबत पत्नीने अमेरिकेला यायचा हट्ट केल्याने संतप्त पतीने पत्नीचे डोके फोडल्याची घटना घडली आहे.

पत्नीने केला अमेरिकेचा हट्ट; पतीने फोडले पत्नीचे डोके
नवी मुंबई : पती सोबत पत्नीने अमेरिकेला यायचा हट्ट केल्याने संतप्त पतीने पत्नीचे डोके फोडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पती विरोधात एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. आठ दिवसांपूर्वी भारतात आलेला पती परत अमेरिकेला जात असल्याने हा प्रकार घडला.
उलवे येथे राहणाऱ्या इंजिनिअर दांपत्यामध्ये हा प्रकार घडला आहे. नोकरी निमित्ताने पती अमेरिकेत रहायला असून पत्नी उलवे येथे रहायला आहे. या महिलेचा पती दहा दिवसांपूर्वी काही दिवसांच्या सुट्टीत अमेरिकेतून भारतात आले होते. मंगळवारी पतीने आपण परत अमेरिकेला जाणार असल्याचे पत्नीला सांगितले. त्यावेळी आपण देखील अमेरिकेला येणार असा हट्ट पत्नीने धरला. त्यावरून पती पत्नीमध्ये भांडण झाले असता, पतीने कोणत्यातरी वस्तूने डोक्यात मारल्याचा आरोप केला आहे. यामध्ये पत्नी जखमी झाल्याने त्यांना उलवेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती विरोधात एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.