शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे दुचाकीचे थकलेले हफ्ते फेडण्यासाठी तरुणाने केली चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 19:42 IST

अल्पवयीन मुलाच्या मदतीने चोरला मोबाइल

ठळक मुद्देगुन्ह्यात वापरलेली ६० हजार रुपयांची दुचाकी पोलिसांनी केली जप्त

पिंपरी : लॉकडाऊन दरम्यान दुचाकीचे हफ्ते फेडणे शक्य झाले नाही. त्यामुळे हफ्ते फेडण्यासाठी पादचाऱ्याचा मोबाईल फोन हिसकावून तरुणाने अल्पवयीन साथीदारासह चोरीचा गुन्हा केला. वाकड पोलिसांनी या तरुणाला जेरबंद केले.  गुड्डू सलीम पठाण (वय २२, रा. चक्रपाणी वसाहत, गणराज कॉलनी, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर बजरंगलाल श्रीनिवास भंग (वय ३०, रा. स्वामी समर्थ कॉलनी, रहाटणी) यांनी याप्रकरणी पोलिसांकडे फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बजरंगलाल भंग हे १० जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास शुभम डेअरी, रहाटणी येथून पायी जात होते. त्यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरील दोन अनोळखी आरोपी यांनी बजरंगलाल भंग यांच्या हातातील मोबाइल फोन हिसकावून पळून गेले. याबाबत बजरंगलाल भंग यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ही चोरी पठाण याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पठाण याचा माग काढून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पठाण यास अटक करून त्याच्याकडून गुन्हयातील चोरलेला आठ हजार रुपये किमतीचा मोबाइल व गुन्ह्यात वापरलेली ६० हजार रुपयांची दुचाकी पोलिसांनी जप्त केली. आरोपी पठाण याने हफ्त्यावर दुचाकी विकत घेतली होती. मात्र लॉकडाऊनमध्ये या दुचाकीचे हप्ते फेडणे त्याला शक्य झाले नाही. त्यामुळे हप्ते फेडण्यासाठी त्याने मोबाईल चोरला असल्याचे तपासात निष्पन्न झाले.वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहायक पोलीस निरीक्षक हरिश माने, पोलीस उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस कर्मचारी बिभीषन कन्हेरकर, सचिन नरुटे, नितीन गेंगजे, शाम बाबा, बापुसाहेब धुमाळ, विक्रम जगदाळे, प्रमोद कदम, तात्या शिंदे, नितीन ढोरजे, दीपक भोसले, विक्रम कुदळ, विजय गंभीरे, जावेद पठाण, सुरज सुतार, प्रशांत गिलबिले, सुरेश भोसले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस