शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

विम्याच्या पैश्यासाठी मालकानेच केला चोरीचा बनाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 21:13 IST

गाडीच्या विम्याचे १८  लाख रुपयांची रक्कम मिळावी. या हव्यासाने गाडी मालकांनी मोटार गाडी  चोरी केल्याचा बनाव केला. मात्र...

हडपसर:  गाडीच्या विम्याचे १८  लाख रुपयांची रक्कम मिळावी. या हव्यासाने गाडी मालकांनी मोटार गाडी  चोरी केल्याचा बनाव केला. मात्र पोलिसांनि त्याचा बनाव  उघडा पडला आहे.हडपसर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे व पोलीस नाईक विनोद शिवले यांना गस्तीदरम्यान दरम्यान एका खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली की,काही दिवसांपूर्वी हडपसर भागातून एक मोटार गाडी क्रमांक (एमएच१२. . पीक्यू.२९७५ )चोरीस गेली. याबाबत हडपसर पोलीस स्टेशन येथे वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील गाडी ही चोरीस गेली नसून ती फियार्दीने वीम्याच्या पैशासाठी गाडी मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील सीमेलगत एका गावांमध्ये लपवून ठेवली होती. सदर गाडी हडपसर मांजरी भागात फिरत असून त्या गाडीचा नंबर प्लेट  लावलेली नाही.  बातमीच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक भांगे यांचे गस्ती पथक फिरत असताना सोलापूर महामार्गावर मांजरी फाटा येथे ही गाडी उभी असल्याची दिसली . गाडी संशय असल्याने दिसल्याने लगेच पोलिसांनी गाडीतीलि चालकाला  ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता. त्याने आपले नाव  किरण दत्तात्रेय जाधव (वय २४, रा. पापडे वस्ती, मूळ राहणार खामकरवाडी उस्मानाबाद बार्शी ) असे असल्याचे सांगितले.त्याच्याकडे गाडीचे नंबर प्लेट गाडीचे कागदपत्र बाबत चौकशी करता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिल्याने त्यात हडपसर पोलीस स्टेशन येथे आणून अधिक चौकशी केली असता किरण जाधव यांनी सांगितले की गाडी व्यवसाय करता विकत घेतली होती. परंतु फायनान्स हप्ते भरणे शक्य नसल्याने त्याने त्याची  गाडी चोरी केल्याचा बनाव करून एक इफको  टोकियो इन्शुरन्स कंपनीकडून गाडीचे पैसे घ्यायचे व गाडी मध्यप्रदेश मध्ये विकून त्याचे सुद्धा पैसे घ्यायचे असा बनाव रचला होता. ठरलेल्या बनावानुसार फियादीर्ने मागील वर्षी २५ सप्टेंबरमध्ये गाडी चोरीस गेल्या बाबत हडपसर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती. त्यानंतर त्यांनी ही गाडीही प्रथम अहमदनगर येथे काही दिवस लपवून ठेवली . त्यानंतरच शिरपूर जिल्हा धुळे येथे लपवून ठेवली. सदर गाडीही मध्य प्रदेश येथील एका इसमास विकण्याचे ठरले होते. परंतु इन्शुरन्स कंपनीला आवश्यक असणारा पोलिसांचा अंतिम अहवाल प्राप्त न झाल्याने गाडीचा व्यवहार होऊ शकला नाही. त्याकरता हडपसरमध्ये आलो होतो. असे जाधव यांनी सांगितले. पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी गाडी चोरीस गेल्याचे खोटी तक्रार देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याने फियार्दीकडून या गुन्ह्याकामी गाडी जप्त करून खोटी तक्रार दिल्याबाबत लष्कर न्यायालयात खटला दाखल केला आहे. तपास पथकाने गाडी जप्त करून १८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे

टॅग्स :PuneपुणेThiefचोरPoliceपोलिस