शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील मडगाव येथील कंदबा डेपोतून इंधन चोरीचा भांडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 21:29 IST

ट्रान्सपोर्टर व टँकर चालकावर गुन्हा नोंद; अनेकजण पोलिसांच्या रडारावर

ठळक मुद्देसांगेचे माजी आमदार सुभाष फळदेसाई यांच्या मालकीच्या पेट्रोलपंपला इंधन पुरविणाऱ्या टँकरमधून पेट्रोलची ही चोरी करण्यात आली होती. फातोर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.

मडगाव - गोव्यातील मडगाव येथील कंदब परिवहन महामंडळाच्या डेपोतून इंधनची चोरी होत असल्याचा गोष्टीचा भांडाफोड झाला आहे. काल रविवारी डिझेल चोरीची ही घटना उघडकीस आली होती. मागाहून मडगाव कंदब डेपोचे मॅनेजर आर. ए. लुईस यांनी यासंबधी फातोर्डा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. आज सोमवारी पोलीस तपासात तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तपास केला प्रथमदर्शनी तपासात या डेपोत पुरवठा होत असलेल्या डिझेलची चोरी होत असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी डेपोत इंधन पुरवठा करणाऱ्या मेसर्स वेर्णेकर ट्रान्सपोर्टचे अरविंद वेर्णेकर तसेच टँकर चालकावर गुन्हा नोंद केला आहे. या चोरी प्रकरणाची व्याप्ती बरीच मोठी असून, इंधन चोरी करणाऱ्या  माफियांचा त्यात सहभाग असावा असा पोलिसांना संशय आहे. पुढील तपास चालू असल्याची माहिती दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी दिली.भारतीय दंड संहितेच्या ३७९, २८५ व पेट्रोलियम कायदा २००० कलम १२ अंतर्गंत पोलिसांनी संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे. फातोर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत. रविवारी जीए०८ व्ही ८८२५ हा इंधन घेउन कदंबच्या डेपोत आला होता. कंदब वाहतूक परिवहनच्या टँकर तपासणी समितीने या टँकरची तपासणी केली होती. नंतर टँकर आत सोडला होता. मे. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉपरेशन लिमिटेड १२ केएल हायस्पीड डिझेलचा पुरवठा करतात. मे. वेर्णेकर ट्रान्सपोर्ट हा टँकरव्दारे इंधन मडगावच्या कंदबाच्या डेपोत पोहचवितो. आतमध्ये असलेल्या टाकीत हे इंधन साठवून ठेवले जातात. रविवारी इंधन टाकीत सोडल्यानंतर मास्टर व्हॉल्व सुरु केला असता, टँकरच्या इंधन टाकीलाही गळती लागली. त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना संशय आला. चौकशीअंती टाकीच्या खालच्या भागातून एक पाईप टँकरच्या टाकीला जोडला होता असे आढळून आले. मात्र टँकरची टाकीत आधीच डिझेल असल्याने इंधन जास्ती होउन ते बाहेर पडायला लागले व चोरीचे बिंग फुटले.

डेपोतील टाकीत डिझेल सोडल्यानंतर ते खालच्या टाकीत जाते, त्या टाकीत एक पाईप बसविला होता. तो पाईप टॅकरला जोडून डिझेलची चोरी केली जात होती असे प्राथमिक तपासात पोलिसांना आढळून आले आहे. सध्या तपास प्राथमिक स्थितीत असल्याने पोलिसांनी तपासकामाबददल गुप्तता बाळगली आहे. फातोर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत याच वर्षी एका पेट्रोल वाहू टँकरमधून इंधनची चोरी करण्याचे प्रकरण घडले होते. सांगेचे माजी आमदार सुभाष फळदेसाई यांच्या मालकीच्या पेट्रोलपंपला इंधन पुरविणाऱ्या टँकरमधून पेट्रोलची ही चोरी करण्यात आली होती. स्वत: फळदेसाई यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. पोलिसांनी नंतर सर्व संशयितांना अटकही केली होती. कंदबाच्या डेपोत डिझेलची जी चोरी झाली आहे त्याचे कनेक्शन फातोडर्यातील त्या इंधन चोरी प्रकरणाशी असावे असाही पोलिसांचा कयास आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे जो टँकर पोलिसांनी पकडला आहे त्याचे मालक हे फातोडर्यातील इंधन चोरी प्रकरणात पकडलेल्या एका संशयिताच्या कुटुंबातील आहे. टँकर सध्या कुणाच्या नावे आहे, याची शहानिशा सध्या पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Petrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंपtheftचोरीArrestअटकPoliceपोलिस