शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

नालासोपाऱ्याच्या पेट्रोल पंपावरील चोरीचा गुन्हा उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2019 7:21 PM

तीन आरोपींना केली अटक, 5 लाख 93 हजारांचा मुद्देमाल जप्त

ठळक मुद्देपेट्रोल पंपावर 20 मेला मध्यरात्री लाखोंची चोरी झाल्याची खळबळजनक घटना घडली होतीतुळींज पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हा चोरीचा गुन्हा उघड केला

नालासोपारा - नालासोपारा पूर्वेकडील संतोष भवन परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपावर 20 मेला मध्यरात्री लाखोंची चोरी झाल्याची खळबळजनक घटना घडली होती. तुळींज पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हा चोरीचा गुन्हा उघड केला असून तीन आरोपींसह 5 लाख 93 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संतोष भवन परिसरातील मुख्य रस्त्यावर इंडियन ऑइल नावाचा पेट्रोल पंप असून  चोरांनी 20 मेच्या मध्यरात्री पंपाच्या कार्यालयाच्या मागच्या दिशेने जाऊन खिडकीची ग्रील तोडून तिजोरीत ठेवलेले 11 लाख 22 हजार रुपयांची रोख रक्कम चोरी करून पसार झाले होते. तुळींज पोलिसांनी 21 मे ला गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. मुंबईच्या विविध परिसरात चोरी करणारे असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महावीर जोहर सिंग (32), गंगासिंग मनोहरसिंग कडेसा (35) आणि अजयन कारीयंबु पावूरयेडू (39) यांना पकडले असून तपासात चोरी केल्याचे कबुल केले आहे. पोलिसांनी आरोपितांकडून 4 लाख 43 हजार रोख रक्कम आणि 1 लाख 50 हजार रुपयांची कार असा एकूण 5 लाख 93 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसPetrolपेट्रोलRobberyदरोडा