शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पेरणेफाटा येथे एटीएम फोडून २१ लाखांची लूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 12:55 IST

आयडीबीआय बँकेकडून सुरक्षिततेबाबत काळजी नाही. घटना घडून एक दिवस उलटला तरी बँकेचे अधिकारी आले नाहीत..

लोणीकंद : पुणे-अहमदनगर रस्त्यावर  पेरणेफाटा  येथे  हमरस्त्यालगत असलेले आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी सुमारे २१ लाख ८६ हजार रुपये लुटल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली.आयडीबीआय बँकेकडून सुरक्षिततेबाबत काळजी नाही. घटना घडून एक दिवस उलटला तरी बँकेचे अधिकारी आले नाहीत, सुरक्षारक्षकही नाहीत, पुरेसे सीसीटीव्ही नाहीत, या निमित्ताने या गंभीर बाबी समोर आल्या आहेत. याबाबत लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेरणेफाटा (ता. हवेली) येथे पुणे नगर हमरस्त्यालगत असलेले आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडल्याची खबर बँकेच्या अधिकाऱ्यांकडून समजल्यानंतर लोणीकंद पोलीस ठाण्याचे निरीक्षक डी. एस. हाके, सुरेशकुमार राऊत यांनी पोलीस पथक व बँकेच्या अधिकाऱ्यांसह आज सायंकाळी सातच्या सुमारास घटनास्थळी पाहणी केली. यावेळी एटीएम मशिनची एका बाजुची लोखंडी प्लेट गॅस कटरच्या सहायाने कापून एटीएम मशीन उघडल्याचे व त्यातून २१ लाख ८६ हजार रुपये लुटल्याचे निदर्शनास आले. आदल्या दिवशी २६ लाखांची रोकड भरल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.रस्त्यावर असले तरी दोन्ही बाजूने भाजी बाजार व वर्दळीचे ठिकाण असूनही चोरी झाली.काल दुपारी एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या कॅश व्हॅन पथकाला शटर अर्धवट बंद दिसल्याने पथकाने ही घटना बँकेला कळवली. दरम्यान बँकेचे अधिकारी व लोणीकंद पोलीस आज सायंकाळी आल्यानंतर ही चोरी सर्वांना समजली. दरम्यान सायंकाळी अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या...............दरम्यान गुरुवारी (दि. १३) मध्यरात्री ते शुक्रवार (दि. १४) पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली असावी. तसेच माहितगार असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. लोणी कंद पोलीस व  स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पथके तयार करुन वेगाने तपास सुरु केला आहे..............बँका गंभीर नाहीत. सुरक्षा गार्डची  नेमणूक केलेली नाही. पुरसे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. बोर्ड दिसत नाही. बँकेने सुरक्षा काळजी घेणे गरजेचे आहे.- डी. एस. हाके, पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे

टॅग्स :Loni Kandलोणी कंदCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसatmएटीएमtheftचोरी