शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोंधळ घालणाऱ्या तरुणांना हटकले; आई-मुलावर चाकूने सपासप वार केले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 16:14 IST

हल्ल्याचे सत्र सुरूच, आरोपीला मंगळवारी पहाटे उचलले...

​लातूर : दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या व्यक्तीला हटकल्याच्या कारणावरून एका तरुणासह त्याच्या आईवर चाकूने सपासप वार केल्याची घटना १ मार्च रोजी रात्री १० वाजता महादेव पार्वती नगरातील भांबरी चौकात घडली. याबाबत एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मंगळवारी पहाटे आरोपीला उचलले आहे. 

पोलिसांनी सांगितले, फिर्यादी बालाजी राजाराम सोमवंशी (वय ३८) हे आपल्या घराजवळ असताना, आरोपी चंद्रकांत नवन्नाथ कांबळे हा दारूच्या नशेत मोठ्याने शिवीगाळ करत होता. 'येथे फॅमिली राहते, शिवीगाळ करू नकोस' असे बालाजी यांनी त्याला समजवून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचा राग धरून आरोपीने 'तुला बघून घेतो' अशी धमकी देत बालाजी यांना हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, ​आई आणि भावावरही वार करण्यात आले. या हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून चाकू घेऊन फरार झाला. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला मंगळवारी पहाटे उचलले आहे. भरवस्तीत झालेल्या हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे.

याबाबत बालाजी सोमवंशी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपी चंद्रकांत कांबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भांडण सोडवण्यासाठी आलेल्या भावावर चाकूहल्ला... -

भांडण सोडवण्यासाठी बालाजी यांचा भाऊ नागेश सोमवंशी हा मध्यस्थी करण्यास आला असता, आरोपीने 'तुला खल्लास करतो' असे म्हणत जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या पोटावर चाकूने गंभीर वार केला. मुलाला वाचवण्यासाठी धावून आलेल्या आई चंद्रकलावती सोमवंशी यांच्यावरही आरोपीने चाकूने हल्ला करून त्यांना जखमी केले. 

हल्ल्यात गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरु... -

​या भीषण हल्ल्यात नागेश सोमवंशी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर लातुरातील रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपीने नागेश यांच्यावर चाकूने सपासप वार केल्याचे पोलिसांनी सांगितले.

हाणामारीत आरोपीही जखमी... -

मंगळवारी पहाटे आरोपीला ताब्यात घेतले असता, या घटनेत त्यालाही मार लागल्याने जखमी झाल्याचे समोर आले आहे. एकमेकांना करण्यात आलेल्या मारहाणीत हा प्रकार घडला आहे. - दयानंद सानप, सपोनि. लातूर

English
हिंदी सारांश
Web Title : Drunk man stabbed a youth and his mother for questioning him.

Web Summary : In Latur, a drunk man stabbed a youth and his mother after being questioned for public intoxication. Balaji Somvanshi confronted the man, Chandrakant Kamble, who then attacked Balaji, his brother Nagesh, and their mother. Nagesh is seriously injured. Kamble is now in custody.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस