शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

महिलेने मंत्रालयाबाहेर केला आत्मदहनाचा प्रयत्न, म्हणाली... पोलिसांनी खोट्या प्रकरणात अडकवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 20:51 IST

Suicide Attempt : मिळालेल्या माहितीनुसार, महिला रॉकेल घेऊन मंत्रालयाबाहेर पोहोचली होती. तिथे पोहोचल्यावर पोलिसांनी तिला खोट्या प्रकरणात अडकवल्याचे महिलेने सांगितले.

मुंबई - एका महिलेने मंत्रालयाबाहेर तिच्याविरुद्ध नोंदवलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी करत आत्मदहनाचा प्रयत्न केला. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, महिला रॉकेल घेऊन मंत्रालयाबाहेर पोहोचली होती. तिथे पोहोचल्यावर पोलिसांनी तिला खोट्या प्रकरणात अडकवल्याचे महिलेने सांगितले.विक्रोळी पार्क शहरातील रहिवासी असलेल्या 60 वर्षीय महिलेने सांगितले की, ती निर्दोष आहे आणि तिच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यात यावा. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजता महिलेने स्वत:वर रॉकेल ओतून घेऊन पेटवून घेण्याचाप्रयत्न केला. मात्र तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तिला वाचवून ताब्यात घेतले. त्यानंतर महिलेला मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात नेण्यात आले, जिथे तिच्याविरुद्ध आयपीसी कलम 309 अंतर्गत आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला.महिलेचा आत्महत्येचा प्रयत्नयाआधीही गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुंबईतील मंत्रालयाबाहेर एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पुणे जिल्ह्यातील दौंडच्या पोलीस उपअधीक्षकाने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकरणात न्याय मिळत नसल्याने तिने मुंबईत येऊन मंत्रालयाच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले.

महिलेने वारंवार तक्रार केली

पोलीस अधिकाऱ्याविरोधात तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचे महिलेने सांगितले. उलट पोलिसांनी महिलेवर आरोप केले. या महिलेने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार केली. मात्र न्याय न मिळाल्याने त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईMantralayaमंत्रालयPoliceपोलिस