पत्नीने साथीदाराच्या मदतीने काढला पतीचा काटा; झोपेच्या गोळ्या देऊन चाकूने केले वार
By रूपेश हेळवे | Updated: September 22, 2022 16:51 IST2022-09-22T16:50:44+5:302022-09-22T16:51:24+5:30
याबाबत पत्नी अरुणा दशरथ नारायणकर ( रा. जुना विडी घरकुल) व बाबासो जालिंदर बाळशंकर ( रा. जवळगा, अक्कलकोट ) या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पत्नीने साथीदाराच्या मदतीने काढला पतीचा काटा; झोपेच्या गोळ्या देऊन चाकूने केले वार
सोलापूर : संबंधांमध्ये आड येणाऱ्या पती दशरथ नागनाथ नारायणकर ( रा. जुना विडी घरकुल) यांचा पत्नीने साथीदाराच्या मदतीने गळ्यावर चाकूने वार करत काटा काढला. दरम्यान, चाकूने वार करण्यापूर्वी पत्नीने पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या, अशी माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत पत्नी अरुणा दशरथ नारायणकर ( रा. जुना विडी घरकुल) व बाबासो जालिंदर बाळशंकर ( रा. जवळगा, अक्कलकोट ) या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेच्या सपोनि संजय क्षीरसागर यांच्या पथकाने २४ तासात हा गुन्हा उघडकीस आणला.
बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दशरथ यांचा खून झाल्याची घटना घडली होती. याबाबत आरोपी पत्नीने फिर्याद दिली होती. पण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत २४ तासात पत्नीला व प्रियकरांना ताब्यात घेत अटक केली. त्यांना न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे.
ही कारवाई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संजय क्षीरसागर, पोलीस अमलदार महेश शिंदे कृष्णांत कोळी राजू मुदगल कुमार शेळके निलोफर तांबोळी आदींनी केली.