शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पत्नी गेली सोडून म्हणून दुसऱ्या महिलेला घातली लग्नाची मागणी; नकार दिल्याने झाडली गोळी अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 21:33 IST

Shot dead : छगन बंजारा (३०) आणि ममता (२३) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना राजस्थानमधील पाली येथे घडली. 

एका इसमाची पत्नी सोडून गेली म्हणून महिलेला लग्नाची मागणी घातली. मात्र, तिने देखील लग्नास नकार दिला. तिचे दुसऱ्यासोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याचा संशय इसमाला आला. यातूनच त्याने महिलेवर गोळी झाडून हत्या केली. यानंतर स्वतःवरही गोळी झाडली. छगन बंजारा (३०) आणि ममता (२३) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना राजस्थानमधील पाली येथे घडली. 

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, छगन आणि ममता हे एकमेकांना पाच वर्षांपासून ओळखत होते. दोघेही एकच काम करीत होते. छगन विवाहित असून, दोन मुलं आहेत. छगनच्या त्रासाला कंटाळून पत्नी सोडून गेली. यादरमम्यान ममताला भेटल्यानंतर छगन तिच्या प्रेमात पडला. त्याला ममतासोबत लग्न करायचे होते. मात्र, ममता आणि तिच्या आईला हे मान्य नव्हते, असे पोलिसांनी सांगितले. ममताचे सुद्धा दोनदा लग्न झाल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. मात्र, दोन्ही पतींपासून विभक्त झाल्यानंतर ती आई-वडिलांसोबत राहत होती. 

 

छगनने लग्नाची मागणी घातल्यानंतर ती सतत नकार देत होती. छगनला ममताचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. या संशयावरून त्याने ममताला अनेकदा दम भरला. तसेच लग्नाचा प्रस्ताव स्विकारण्यासाठी दबाव टाकत होता. छगन रात्री नऊ वाजताच्या सुमारास सुभाषनगर येथील ममताच्या घरी आला. यावेळी ममता कुटुंबीयांसोबत जेवण करीत होती. छगनच्या हातात बंदूक पाहून ममताने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, छगनने तिला पकडले आणि गोळ्या झाडल्या. गोळी लागल्याने ममता तिथेच कोसळली. यानंतर छगनने स्वत:वरही गोळी झाडली. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी ममताला मृत घोषित केले आणि छगनला जोधपूरला रेफर करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान छगनचाही मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली आहे. 

 

टॅग्स :Deathमृत्यूFiringगोळीबारPoliceपोलिसRajasthanराजस्थान