शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

कांदिवलीतील हत्याकांडाला जादूटोण्याचे वळण; मृतदेहांच्या पायाला हळद-कुंकू, कापलेले लिंबूही सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 15:32 IST

पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मृत किरण आणि तिची मुलगी यांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना कापलेले लिंबू, हळद-कुंकू लावलेल्या अवस्थेत सापडले आहेत.

मुंबई : शहरात गुरुवारी खळबळ उडविणाऱ्या दळवी रुग्णालय इमारतीमधील हत्या आणि आत्महत्या प्रकरणाचा तपास सध्या कांदिवली पोलीस करत आहेत. तपासादरम्यान मृताच्या घरात कापलेले लिंबू आणि मृतदेहांच्या पायाला हळद-कुंकू लावण्यात आल्याचे आढळले आहे. त्यामुळे तंत्रमंत्र किंवा जादू-टोणा प्रकरणातून हा एखादा बळीचा प्रकार आहे का, या अनुषंगाने सध्या पोलीस विचार करत आहेत.किरण दळवी (४५), मुस्कान दळवी(२६), भूमी दळवी (१७) आणि शिवदयाल सेन (६०) अशी इमारतीत सापडलेल्या मृतांची नावे आहेत. पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मृत किरण आणि तिची मुलगी यांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना कापलेले लिंबू, हळद-कुंकू लावलेल्या अवस्थेत सापडले आहेत. तसेच गळफास घेतलेल्या भूमी आणि शिवदयाल याच्या पायाला हळद-कुंकू लावलेले आढळले. त्यामुळे हा सगळा प्रकार तंत्रमंत्राशी किंवा जादू-टोण्याशी संबंधित आहे का? या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. सेन हा मूळचा बंगाली आहे.कोणत्याही वाईट गोष्टीचा किंवा एखाद्या पिडेचा कायमचा अंत करायचा असल्यास लिंबू कापून त्यात हळदी-कुंकू लावणे, एखादे शुभ कार्य करण्यासाठी किंवा भूत-पिशाच्चचा अंत करण्यासाठी, मृत व्यक्तींचा अतृप्त आत्मा भटकून त्रास देऊ नये, यासाठी हळदीकुंकू लावणे, अशी अंधश्रध्दा काहींच्यात असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानुसार सेन यानेच हा प्रकार केला असावा, असा संशय व्यक्त होत आहे. किरण यांचे पती आशिष दळवी हे मुंबईत दाखल झाले असून त्यांना प्रकरणाचा जबर धक्का बसला आहे. सर्वांच्या अंत्यसंस्कारानंतर त्यांच्याकडे चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान मृत्यूपूर्वी किरण, मुस्कान आणि भूमी यांना घेऊन सेन हा इंदुरला आशिष यांच्याकडे गेला होता. त्यावेळी त्यांच्यात काही वाद झाले का, याबाबतीतही पोलीस चौकशी करणार आहेत.

न्यायवैद्यक प्रयोगशाळेत सुसाईड नोटची पडताळणी -  बुधवारी उशिरा रात्री सेन आणि भूमी यांनी किरण, मुस्कान यांची हत्या करत स्वतः आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघड झाला आणि कांदिवलीसह शहरात एकच खळबळ उडाली. सेनकडे सापडलेल्या सुसाईड नोट हिंदी आणि इंग्रजीमध्ये असून त्यात भूमीने वडील आशिष यांना लहान भावाची काळजी घ्या, असे सांगितले आहे. त्यानुसार या सुसाईड नोट पोलीस पडताळणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवणार आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस