लिफ्टमधून येण्या-जाण्यावरुन तिघांनी केली तरुणाची धुलाई
By विलास जळकोटकर | Updated: March 27, 2023 19:42 IST2023-03-27T19:42:17+5:302023-03-27T19:42:33+5:30
किरकोळ वादातून ३० वर्षीय तरूणाला मारहाण

लिफ्टमधून येण्या-जाण्यावरुन तिघांनी केली तरुणाची धुलाई
विलास जळकोटकर, सोलापूर: लिफ्टमधून येण्याजाण्याच्या किरकोळ कारणावरुन तिघांनी मिळून तरुणाची लाथाबुक्क्यांने मारहाण करुन धुलाई केली. सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास साई गार्डन अपार्टमेंट, कुमठा नाका येथे ही घटना घडली. विशाल सुरेश मनवानी (वय ३०) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
यातील जखमी तरुण हा साई गार्डन अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास राहतो. सकाळी ११ च्या सुमारास लिफ्टमध्ये जाण्या-येण्याच्या कारणावरुन याच अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या तिघांची आणि जखमीची कुरबूर झाली. भांडण विकोपाला गेले आणि लाथाबुक्क्याने आपणास मारहाण केल्याचे जखमीने सिव्हील पोलीस चौकीत नमूूद केले आहे. या मारहाणीत तरुणाच्या सर्वांगाला मार लागल्याने शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.