शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चोराने गिळली सोनसाखळी, दवाख्यान्यात नेऊन बाहेर काढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 09:57 IST

सायन रुग्णालयात एण्डोस्कोपीने काढली बाहेर

गौरी टेंबकर-कलगुटकर

मुंबई : वांद्रे येथील माउंट मेरी जत्रेत शनिवारी तीन वर्षांच्या मुलीची तीन ग्रॅम वजनाची सोनसाखळी एका जोडप्याने चोरली. पोलिसांपासून लपविण्याच्या भानगडीत त्यातील एकाने चक्क ती गिळून टाकली. मात्र, वांद्रे पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले आणि सायन रुग्णालयात दाखल करत ती सोनसाखळी त्यांनी हस्तगत केली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. 

राकेश माळी (२३) आणि सीता माळी (२३) असे आरोपी जोडप्याचे नाव असून, दोघेही राजस्थानमधील दूधवाला गावचे रहिवासी आहेत. माउंट मेरी जत्रेत लोकांना टार्गेट करून सोन्याच्या चेन, पाकीट आणि मौल्यवान वस्तू चोरण्यासाठी हे जोडपे मुंबईत आले. शनिवारी दुपारी फिल्वी नारकर या नालासोपाराच्या रहिवासी त्यांची ३ वर्षांची मुलगी तानियासोबत माउंट मेरीला आल्या होत्या. चर्चच्या बाहेर सीताने तानियाच्या  गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला आणि तिचा पती राकेशला साखळी दिली. ज्याने ती तोंडात ठेवून नंतर गिळली. फिल्वी यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक सुनील कदम आणि एटीसी कर्मचारी यांनी आरोपींना पकडले. त्यांच्या झडतीत सोनसाखळी सापडली नाही. चौकशीत आरोपीने ती गिळल्याचे स्पष्ट झाले. हे समजताच पोलिसांनी माळीला सायन रुग्णालयात दाखल केले . रविवारी डॉक्टरांनी एन्डोस्कोपी करून  माळीच्या पोटातली सोनसाखळी बाहेर काढली. यानंतर आरोपी राकेश माळी आणि त्याची पत्नी सीता माळी यांना रविवारी अटक करण्यात आली.

टॅग्स :GoldसोनंCrime Newsगुन्हेगारीThiefचोरChain Snatchingसोनसाखळी चोरी