शहरं
Join us  
Trending Stories
1
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
2
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
3
India ODI Squad vs South Africa : केएल राहुल कॅप्टन; BCCI नं ऋतुराजसाठीही उघडला टीम इंडियाचा दरवाजा
4
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
5
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
6
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
7
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
8
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
9
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
10
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
11
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
12
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
13
फेसबुक मैत्री नडली! फेक ट्रेडिंग ॲपवर २.९० कोटींचे इन्व्हेस्टमेंट, नोएडात व्यापाऱ्याला महिलेनं 'असं' लुटलं
14
मोबाईल दिला नाही आणि आठवीत शिकणाऱ्या दिव्याने पाळण्याच्या दोरीनेच मृत्यूला मारली मिठी, नागपुरमधील चिंताजनक घटना
15
दिवसा काम अन् रात्री अभ्यास; स्वप्न सत्यात उतरवून 'तो' झाला IAS, संपूर्ण गावाला वाटतो अभिमान
16
बॉम्बची धमकी अन् 'गल्फ एअर'च्या प्रवाशांचे धाबे दणाणले; 'GF-274' मध्ये नेमकं काय घडलं?
17
अजब लव्हस्टोरी! दूध विकायला येणाऱ्या तरुणावर जडले प्रेम, ४ मुलांची जबाबदारी पतीवर टाकून पत्नी पळाली!
18
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार! जाणून घ्या 'फिटमेंट फॅक्टर' आणि नवीन बेसिक सॅलरीचे गणित!
19
'पुण्याला जातो' सांगून गेलेल्या अंडर-१६ खेळाडूचा जंगलात सापडला मृतदेह; मोबाईलमुळे पटली ओळख!
20
सौदी अरेबियात ३१ हजार जागांसह तब्बल ९१ हजार नोकऱ्या; मुख्य नोकरीसोबत सेवा करण्याची संधी
Daily Top 2Weekly Top 5

चोराची पॅन्ट घसरली आणि गुन्हा उलगडला... घरफोडीतल्या गुन्हेगाराला अटक

By सूर्यकांत वाघमारे | Updated: September 15, 2022 20:42 IST

चोरीचा २८ लाखांचा ऐवज पोलिसांनी केला हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून २० गुन्ह्यांची उकल झाली असून त्यामधील २८ लाख ३२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. अटक केलेल्या गुन्हेगारावर यापूर्वी देखील १४ गुन्हे दाखल आहेत.

ऐरोली, कोपर खैरणे परिसरात घडणाऱ्या घरफोडीच्या गुन्ह्यांच्या तपासात गुन्हे शाखा पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. गतमहिन्यात ऐरोली सेक्टर ३ मध्ये १० लाखाची घरफोडी झाली होती. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष १ चे वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे यांचे पथक तपास करत होते. त्यामध्ये सहायक निरीक्षक आर. एम. तडवी, हर्षल कदम, होल्डर रोहिदास पाटील, बालाजी चव्हाण, निलेश किंद्रे, शशिकांत जगदाळे, अजय वाघ आदींची विविध पथके तयार करण्यात आली होती. त्यांनी मागील काही महिन्यात ऐरोली परिसरात घडलेल्या गुन्ह्याच्या ठिकाण व भवतालच्या सीसीटीव्ही मार्फत गुन्हेगारापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला होता. परंतु प्रत्येक वेळी अर्ध्यावरून तपासाचा धागा सुटत होता. अखेर २६ ऑगस्टला घडलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान एक संशयिताची माहिती हाती लागली होती. त्यासाठी पथकाला सहाहून अधिक दिवस सीसीटीव्ही तपासण्यात घालवावे लागले होते. त्यामध्ये एका रिक्षाचालकांच्या मदतीने पोलिसांचे पथक कळवा येथे पोचले असता सराईत गुन्हेगार हाती लागला.

संतोष घनघाव (४५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो कळवा येथील अण्णाभाऊ साठे नगरचा राहणारा आहे. ऐरोली परिसरात रात्रीच्या वेळी घरफोडी केल्यानंतर ठाणे बेलापूर मार्गावरील ऐरोली येथील टी जंक्शन पासून रिक्षाने तो कळव्याला जात असे. यामुळे पुलापासून पुढे तो कुठे गेला याचा शोध पोलिसांना लागत नव्हता. परंतु गतमहिन्यातल्या गुन्ह्यात त्याने काही अंतर अगोदरच रिक्षा पकडल्याने त्याच्यापर्यंत पोचण्याचा मार्ग पोलिसांना सापडला. त्याच्या घरातून ४६ तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे. तर इतर सोने त्याने विकलेल्या सोनारांकडून परत मिळवण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांनी तब्बल २८ लाख ३३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्याच्याकडून हस्तगत केले आहेत. त्याने ऐरोली व कोपर खैरणे परिसरात केलेले घरफोडीचे २० गुन्हे उघड झाले असल्याची माहिती पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी सह आयुक्त डॉ. जय जाधव, अपर आयुक्त महेश घुर्ये, उपायुक्त सुरेश मेंगडे आदी उपस्थित होते.

संतोष याच्यावर यापूर्वीचे १४ गुन्हे असून त्यामध्ये त्याला शिक्षा देखील झालेली आहे. २०१८ मध्ये शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा तो घरफोडी करत होता. परंतु तो अनेक वर्षांपासून ऐरोलीत फिरत असल्याने परिसरातल्या सीसीटीव्हीची त्याला माहिती होती. यामुळे गुन्हा करताना व जाताना तो सीसीटीव्हीत दिसणार नाही याची खबरदारी घ्यायचा. गतमहिन्यात केलेल्या गुन्ह्यात त्याला १० लाखाचे दागिने हाती लागले. हे दागिने पॅंटीच्या खिशात ठेवून तो चालत जात असताना दागिन्यांच्या वजनाने पॅन्ट खाली सरकू लागली. यामुळे नेहमीच्या ठिकाणांऐवजी काही अगोदरच त्याने रिक्षा पकडली. याच रिक्षातील प्रवासामुळे पोलीस त्याच्यापर्यंत पोहचू शकले. 

...तरीही झोपडीतच

संतोष याच्याकडे २८ लाखाचे दागिने असतानाही ते तो विकू शकला नव्हता. हे दागिने झोपडीतच डब्यामध्ये ठेवलेले होते. अनेक सोनारांनी त्याच्याकडून दागिने विकत घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे गरजेनुसार दागिन्यांचा एक एक भाग काढून तो विकून त्यातून पैसे मिळवायचा.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरीPoliceपोलिस