अवतारसिंग यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीचे दहशतवादी कनेक्शन आलं समोर

By मनीषा म्हात्रे | Updated: July 26, 2022 19:17 IST2022-07-26T19:15:53+5:302022-07-26T19:17:22+5:30

Terror Connection : पंजाबच्या भटिंडा कारागृहात कैद असलेल्या त्याचा साथीदार दिलप्रीतसिंघ ओमकार सिंघ डहाण याला एटीएसने मंगळवारी ताब्यात घेत कारवाई केली आहे.

The terrorist connection of the accused in the murder case of Avtar Singh came to light | अवतारसिंग यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीचे दहशतवादी कनेक्शन आलं समोर

अवतारसिंग यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीचे दहशतवादी कनेक्शन आलं समोर

मुंबई : विरोधक टोळीला मदत करतो म्हणून नांदेडमध्ये 2016 रोजी झालेल्या अवतारसिंग उर्फ मन्नू पि जसवतसिंघ गाडीवाले यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीचे दहशतवादी संघटनेशी कनेक्शन समोर आले आहे.  

आरोपी हरविंदर सिंग उर्फ रिंधा पि. चरणसिंग संधू याचा बब्बर खालसा या शीख दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची माहिती समोर येताच हे प्रकरण एटीएसकडे वर्ग झाले. त्यानुसार, पंजाबच्या भटिंडा कारागृहात कैद असलेल्या त्याचा साथीदार दिलप्रीतसिंघ ओमकार सिंघ डहाण याला एटीएसने मंगळवारी ताब्यात घेत कारवाई केली आहे. त्याच्याकडे याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

Web Title: The terrorist connection of the accused in the murder case of Avtar Singh came to light