शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Crime News : फ्लॅटमधून येत होता दुर्गंध, दरवाजा तोडून महिलेचा मृतदेह काढला बाहेर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 13:35 IST

Deadbody Found : दुर्गंधी येऊ लागल्याने काही अनुचित प्रकार घडण्याची भीती वाटल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली.

हैदराबाद शहरातील एका फ्लॅटमधून दुर्गंधी येत होती. फ्लॅटमध्ये एक 50 वर्षीय महिला आपल्या मुलासोबत राहत होती. गेल्या काही दिवसांपासून शेजाऱ्यांनी दोघांनाही बाहेर पाहिले नव्हते. दुर्गंधी येऊ लागल्याने काही अनुचित प्रकार घडण्याची भीती वाटल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला, त्यानंतर महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.महिलेचा मृतदेह कुजला असल्याने दुर्गंधी येत होती. त्याच फ्लॅटमध्ये महिलेसोबत तिला एक 22 वर्षांचा मुलगाही राहत होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. पोलीस महिलेच्या मुलाला ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत. मुलाने खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना रचकोंडा झोनमधील मलकाजगिरी पोलीस स्टेशन परिसरातील आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजाऱ्यांच्या तक्रारीवरून फ्लॅटचा दरवाजा तोडून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. 50 वर्षीय महिला विजया वाणी यांचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. याच फ्लॅटमध्ये विजयाचा 22 वर्षीय मुलगा साईही सापडला होता. साई मानसिकदृष्ट्या   विक्षिप्त असल्याचं सांगितले जात आहे. सध्या पोलिसांनी साईला हत्येच्या संशयावरून चौकशीसाठी प्रतिबंधात्मक कोठडीत घेतले आहे.साई त्याच फ्लॅटमध्ये होता. मात्र, त्याने या घटनेची माहिती इतर कोणाला किंवा पोलिसांना का दिली नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. साईनेच हा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे. या महिलेच्या मृत्यूचे गूढ लवकरच उलगडेल, असा पोलिसांचा दावा आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिलेचा मृतदेह कुजलेला असल्याने तिच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या खुणा दिसत नाहीत. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. मतिमंद असल्याचे सांगण्यात येत असलेल्या साईची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू