भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कृत्यांची यादी वाढत असून आता त्याच्या गुन्हेगारीची साखळीतील जुन्या आणि धक्कादायक प्रकारची चर्चा सुरू झाली आहे. खरातने वयाच्या २० व्या वर्षी, म्हणजेच १९८० मध्ये एका नातेवाईक महिलेचं लैंगिक शोषण केल्याच्या घटनेला या चर्चेच्या निमित्ताने पुन्हा उजाळा दिला जात आहे.
खरात याने १९८० मध्ये, जेव्हा तो २० वर्षांचा होता, तेव्हापासूनच भोंदूगिरीचं जाळं विणायला सुरुवात केल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. याच दरम्यान त्याच्या एका दूरच्या नातेवाईक महिलेला मूल होत नसल्याचा फायदा घेऊन त्याने तिला जाळ्यात ओढल्याची चर्चा वेगाने पसरली आहे.
"तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
गावकऱ्यांचा चोप आणि पलायन
खरातचे हे दुष्कृत्य जेव्हा गावाला समजलं, तेव्हा संतापाची लाट उसळली होती. संतापलेल्या गावकऱ्यांनी खरात याला चांगलाच चोप दिला होता. त्यामुळे तसेच पोलिसांच्या भीतीने खरातने एका रात्रीत गाव सोडलं आणि तो फरार झाला. गाव सोडून पळालेला खरात तब्बल १५ वर्षे गायब होता. या प्रदीर्घ काळात तो कुठे होता? कोणाच्या आश्रयाला होता? आणि त्याने तिथेही असेच प्रकार केले का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. आता पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
Web Summary : Ashok Kharat, a fake guru, faces renewed scrutiny for allegedly exploiting a relative in 1980. Villagers, enraged by his actions, beat him, leading to his overnight flight from the village and fifteen years of hiding. Police are investigating his whereabouts.
Web Summary : फर्जी गुरु अशोक खरात पर 1980 में एक रिश्तेदार के शोषण का आरोप है। ग्रामीणों ने गुस्से में आकर उसकी पिटाई की, जिसके कारण वह रातोंरात गाँव से भाग गया और पंद्रह साल तक छिपता रहा। पुलिस उसकी तलाश कर रही है।