शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! नोकरांनीच मारला दुकानात डल्ला, १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 10:33 IST

गोपाल पलोड यांचे नवीपेठेत पतंजली कंपनीची उत्पादने विक्रीचे दुकान आहे. या ठिकाणी प्रवीण राठी (रा. शाहूनगर) व समाधान धनगर (रा. आसोदा) हे कामाला आहेत.

जळगाव : रिंगरोड येथील रहिवासी गोपाल काशिनाथ पलोड यांच्या नवीपेठेतील दुकानात नोकरांनीच डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुकानातून १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला असून, ही घटना मंगळवारी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, दोन्ही नोकरांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपाल पलोड यांचे नवीपेठेत पतंजली कंपनीची उत्पादने विक्रीचे दुकान आहे. या ठिकाणी प्रवीण राठी (रा. शाहूनगर) व समाधान धनगर (रा. आसोदा) हे कामाला आहेत. परंतु, दोन महिन्यांपूर्वी समाधान हा कौटुंबिक कारणामुळे काम सोडून निघून गेला होता. दरम्यान, मंगळवारी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास पतंजली कंपनीचे अधिकारी इकबाल यांनी गोपाल पलोड यांचा मुलगा कौशल यांना फोन केला आणि तुमचे दुकान इतके उशिरापर्यंत कसे उघडे आहे, अशी विचारणा केली. त्यावर त्याने आपण चंद्रपूर येथे असल्याचे सांगितले. नंतर कौशल याने वडिलांना दुकान उघडे असल्याची माहिती दिली. गोपाल पलोड यांनी लागलीच त्यांच्या पत्नीसह दुकान गाठले.

वाहनात माल भरून नोकर होता रफुचक्कर होण्याच्या तयारीत...दरम्यान, पलोड दाम्पत्याने दुकान गाठल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. दोन महिन्यांपूर्वी काम सोडून गेलेला नोकर समाधान धनगर हा दुकानातून माल चोरून चारचाकी वाहनात भरून रफुचक्कर होण्याच्या तयारीत दिसून आला. त्यावेळी पलोड यांच्या पत्नी विद्या यांनी वाहन अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, समाधान याने त्यांना धक्का देऊन खाली पाडले आणि तेथून पसार झाला.

दुसरा नोकर दिसला पळताना, त्याला पाठलाग करून पकडलेदुकानातील दुसरा नोकर प्रवीण राठी हासुद्धा पळताना गोपाल पलोड यांना दिसून आला. त्याचा पाठलाग करून त्यांनी त्याला पकडले. नंतर दुकानाजवळ आणून अंगझडती घेतल्यावर प्रवीण याच्याजवळ दोन टॉर्च मिळून आल्या. नंतर त्याने बनावट चावीच्या माध्यमातून समाधान व आपण दुकानात चोरी केली असल्याची कबुली दिली. पलोड यांनी लागलीच त्यास शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव