शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळेबाज आरोपीचा शाही थाट; रुग्णालयात वापरतोय मोबाइल, टॅब! बॉम्बे हॉस्पिटलमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 06:37 IST

कॉक्स अँड किंग्जचे प्रवर्तक अजय अजित पीटर केरकर रुग्णालयात मोबाइल व टॅब वापरत असल्याची धक्कादायक बाब कारागृह विभागाच्या कारवाईतून समोर

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पुण्यातील ससून रुग्णालयातील ललित पाटील प्रकरण ताजे असतानाच, कोट्यवधींच्या घोटाळ्यातील आरोपी जागतिक टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनी असलेल्या कॉक्स अँड किंग्जचे प्रवर्तक अजय अजित पीटर केरकर हे रुग्णालयात मोबाइल व टॅब वापरत असल्याची धक्कादायक बाब कारागृह विभागाच्या कारवाईतून समोर आली आहे. गेल्या साडेचार महिन्यांपासून उच्च न्यायालयाच्या आदेशाने ते बॉम्बे रुग्णालयात यकृताच्या आजारावर उपचार घेत आहेत. यामागे नेमका कुणाचा हात आहे, याबाबत आझाद मैदान पोलिस तपास करत आहेत.

येस बँकेत करण्यात आलेल्या हजारो कोटींच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २०२० मध्ये केरकरला अटक केली. ही बँकेची मोठी कर्जदार कंपनी होती. या कंपनीची ३,६४२  कोटींची थकबाकी आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीचे मुंबई आणि यूकेमध्ये मुख्यालय आहे. कॉक्स अँड किंग्ज लि.चे कार्य २२ देश आणि ४ खंडांमध्ये पसरले आहे. केरकरविरुद्ध अनेक गुन्हे नोंद आहे. ईडी, सीबीआय, मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा व इतर एजन्सीने त्याच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. 

बॉम्बे हॉस्पिटलमधील प्रकार

ईडीच्या कारवाईनंतर  केरकर याची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली. त्याची प्रकृती खालावल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाने त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांच्या स्थानिक शस्त्र युनिटचे दोन अधिकारी दोन शिफ्टमध्ये तैनात होते.

गुरुवारी आर्थर रोड कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात अचानक भेट दिली असता, केरकरकडे फोन, टॅब आणि चार्जर सापडले. एवढी सुरक्षाव्यवस्था असताना त्यांच्याकडे फोन टॅब कसे आले? असा सवाल उपस्थित होत आहे. कारागृह विभागाकडून करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, आझाद मैदान पोलिसांनी केरकरविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा दाखल केल्याच्या वृत्ताला आझाद मैदान पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन तडाखे यांनी दुजोरा दिला आहे. याप्रकरणी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार चौधरी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅब, फोन जप्त आर्थर रोड कारागृह अधिकाऱ्यांनी रुग्णालयात भेट दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. मोबाइल, टॅब जप्त करत कारवाई करण्यात आली असल्याचे आर्थर रोड कारागृह विभागाचे अधीक्षक हर्षद अहिरराव यांनी सांगितले. 

पैशांचे व्यवहार?कोणी हे पुरवले? यामध्ये पोलिस किंवा संबंधित रुग्णालयातील कुणाचा हात आहे का? किती दिवसांपासून मोबाइलचा वापर सुरू होता? आतापर्यंत कुणाकुणाशी संपर्क झाला? यादरम्यान कुणाशी पैशांचे व्यवहार झाले आहेत का?  याबाबत पोलिस तपास करत आहेत.  

टॅग्स :hospitalहॉस्पिटलCrime Newsगुन्हेगारीMobileमोबाइल