शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

छगन भुजबळांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 10:32 IST

पोलिसांच्या गुन्हे शाखेने अवघ्या काही तासात तपास करून केली कारवाई

Chhagan Bhujbal Death Threat: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना सोमवारी रात्री एका व्यक्तीने फोन करून ठार मारण्याची धमकी दिली. छगन भुजबळ यांच्या स्वीय सहायकाच्या मोबाईलवर फोन करून त्याने ही धमकी दिली. दरम्यान या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेने अवघ्या काही तासात तपास करून संबंधित तरुणाला महाड येथून ताब्यात घेतले. प्रशांत पाटील असं धमकी देणाऱ्या या तरुणाचं नाव आहे. दारूच्या नशेत त्याने ही धमकी दिल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. 

मंत्री छगन भुजबळ सोमवारी पुणे दौऱ्यावर होते. सोमवारी रात्री त्यांचा मुक्काम पुण्यातील व्हीआयपी सर्किट हाऊस या ठिकाणी होता. दरम्यान सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास भुजबळांचे स्वीय सहाय्यक संतोष गायकवाड यांच्या मोबाईलवर एका व्यक्तीचा फोन आला. त्याने "मला त्यांना मारण्याची सुपारी मिळाली आहे, उद्या मी त्यांना मारणार आहे, आपण सांगून काम करतो, त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे, मी तुम्हाला सांगण्याचं काम केलं आहे" असे म्हणून समोरील व्यक्तीने फोन कट केला. 

पुणे पोलिसांकडे या घटनेची तक्रार आल्यानंतर त्यांनी जलद गतीने तपास केला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तांत्रिक तपास करत अवघ्या काही तासात महाड येथून या तरुणाला ताब्यात घेतले. पहाटे सहा वाजता सुमारास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून सध्या त्याला पुणे शहराकडे आणले जात आहे. प्राथमिक चौकशीत त्याने हे सर्व कृत्य दारूच्या नशेत केले असल्याचे समोर येत आहे. आरोपी तरुण हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील रहिवाशी असून तो ऑपरेटर म्हणून काम करतो. गुगलवर सर्च करून त्याने भुजबळांच्या पीएचा मोबाईल क्रमांक मिळवला आणि हही कृती केल्याची माहिती समोर येत आहे. त्याला पुण्यात आल्यानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळPuneपुणेPoliceपोलिस