शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 05:07 IST

गोळीबार प्रकरणात नवा गुन्हा दाखल.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या एप्रिलमधील गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांनी रविवारी नवा गुन्हा दाखल केला आहे. तसेच, यू-ट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करून सलमानला ठार मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली राजस्थानातून बनवारीलाल लातुरलाल गुजर (२५) याला अटक करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.आरोपी गुजर हा  मूळचा राजस्थानमधील बुंदी परिसरातील रहिवासी आहे. त्याने त्याच्या यू-ट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ अपलोड केला होता. त्यात त्याने असे म्हटले होते की लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि इतर टोळीचे सदस्य माझ्यासोबत आहेत आणि मी सलमान खानला मारणार आहे. कारण त्याने अद्याप माफी मागितली नाही. 

 आरोपीने राजस्थानमधील एका महामार्गावर व्हिडीओ बनवला आणि तो त्याच्या चॅनलवर अपलोड केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासासाठी पोलिसांचे एक पथक राजस्थानला पाठवण्यात आले. त्याने आरोपीला ताब्यात घेत सायबर पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. आरोपीवर आयटी कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

प्रकरण काय?सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर १४ एप्रिलच्या पहाटे मोटारसायकलवरून आलेल्या आरोपींनी गोळीबार  केला होता. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एक अनुज थापन याने १ मे रोजी पोलिस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केली. 

बिश्नोईचा ताबा घेणार- नवी मुंबई पोलिसांनी सलमान खान गोळीबार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार टोळीच्या संशयितासह पाच जणांना अटक केली होती. टोळीच्या चार सदस्यांनी सलमानचे फार्महाऊस, त्याचे वांद्रे निवासस्थान आणि त्याच्या चित्रीकरणाच्या ठिकाणांची टेहळणी (रेकी) केली होती. 

-अहमदाबादच्या साबरमती मध्यवर्ती कारागृहात असलेल्या बिश्नोईला ताब्यात घेण्याची पोलिसांची योजना आहे. त्याचा भाऊ अनमोल कॅनडामध्ये असल्याचे समजते, तो देखील या करणात पोलिसांना हवा आहे. 

टॅग्स :Salman Khanसलमान खानCrime Newsगुन्हेगारीbollywoodबॉलिवूड