पार्टनर म्हणाला, ‘सिगारेट घे अन् टेरेसवरून उडी मार!’

By प्रदीप भाकरे | Updated: June 21, 2023 08:12 IST2023-06-21T08:11:44+5:302023-06-21T08:12:04+5:30

२६ सप्टेंबर २०२२ ते २० जानेवारी २०२३ दरम्यान हा प्रकार इंदूरमध्ये घडला.  

The partner said, 'Take a cigarette and jump off the terrace!' | पार्टनर म्हणाला, ‘सिगारेट घे अन् टेरेसवरून उडी मार!’

पार्टनर म्हणाला, ‘सिगारेट घे अन् टेरेसवरून उडी मार!’

अमरावती : लिव्ह इन पार्टनरने फिमेल पार्टनरवर सिगारेट घेण्याची सक्ती केली. त्यास नकार दिला असता, त्याने तिला अपार्टमेंटमधील टेरेसवरून उडी मारण्यासाठी टॉर्चर केले. वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करून लग्नास नकार दिला. इंदूरहून तिला एकटीला अमरावतीला हाकलून दिले. २६ सप्टेंबर २०२२ ते २० जानेवारी २०२३ दरम्यान हा प्रकार इंदूरमध्ये घडला.  

याप्रकरणी, २१ वर्षीय स्थानिक तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रोहित राजेश शर्मा (२४, इंदूर, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध २० जूनला गुन्हा दाखल केला. तरुणीची आरोपीशी ऑनलाइन ओळख झाली. ती इंदूरला गेली. जात भिन्न असल्याने तिला त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहायचे नव्हते. त्याने वाद घातल्यावर ती राजी झाली. शारीरिक संबंधांची आठवण म्हणून त्यांनी फोटो काढले. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी त्याने तरुणीला दिली. 

खोली बनली छळछावणी
आरोपीने तिला लग्नाबाबत लेखी दिले. त्यामुळे ती त्याच्यासोबत खोली करून राहू लागली. त्यादरम्यान त्यांच्यात संबंध आले. एका बर्थ डे पार्टीत आरोपीने तिला सिगारेट घेण्यासाठी दबाव टाकला. तिने नकार दिला. त्याच रात्री त्याने तिला टेरेसवरून उडी मारण्यासाठी टॉर्चर केले.

Web Title: The partner said, 'Take a cigarette and jump off the terrace!'