शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

उदयपूरच्या घटनेचा महाराष्ट्र-गुजरातमधील खुनांशी संबंध, NIA त्या अँगलने करणार तपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 19:32 IST

Udaipur Murder: कन्हैया लाल यांच्या निर्घृण हत्येचा तपास करणारी राष्ट्रीय सुरक्षा संस्था, महाराष्ट्र आणि गुजरातमधील हत्येच्या घटनांचा उदयपूर घटनेशी संबंध जोडून तपास करत आहे.

Udaipur Murder:राजस्थानच्या उदयपूरमध्ये शिंपी कन्हैया लाल यांच्या निर्घृण हत्येचा तपास राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा (NIA) करत आहे. आता एजन्सीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, NIA या प्रकरणाचा तपास, गुजरात आणि महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या हत्येशी जोडून करणार आहे. 

नुपूर शर्माच्या समर्थनार्थ कन्हैया लाल यांनी सोशल मीडियावर कथित पोस्ट केली होती. त्याचा राग मनात धरुन दोन मुस्लिम तरुणांनी कन्हैया लाल यांची दुकानात घुसून निर्घृण हत्या केली. त्यांच्या हत्येमुळे देशभारात संतापाची लाट आहे. या घटनेविरोधात राजस्थानमध्येही अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली. आता या हत्येचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला आहे. आरोपी तरुणांचे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांशी संबंध आढळून आले आहेत.

या खुनांशी संबंध ?सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 जून रोजी नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्या उमेश कोल्हे या वैद्यकीय व्यावसायिकाचा महाराष्ट्रातील अमरावती येथे शिरच्छेद करण्यात आला होता. याप्रकरणी अब्दुल शोएब, मुदस्सर आणि शाहरुख या तीन आरोपींना अटक करण्यात आली.

त्यापूर्वी, 25 जानेवारी रोजी गुजरातमधील धंडुकातील मोधावाला भागात 30 वर्षीय किशन भारवाडची हत्या करण्यात आली होती. शब्बीर आणि इम्तियाज यांना खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास एनआयए आणि एटीएसने केला होता. वास्तविक, 6 जानेवारीला किशनने फेसबुकवर एक पोस्ट केली होती. ज्यात त्यांनी भगवान कृष्ण पैगंबर मोहम्मद पेक्षा महान असल्याचे म्हटले होते. मात्र, नंतर त्यांनी या पोस्टबद्दल माफीही मागितली.

एनआयएला साम्य आढळलेया सर्व घटनांमध्ये साम्य असल्याचे एनआयएच्या सूत्रांनी सांगितले. या प्रकरणाचा एकाच अँगलने तपास केला जाणार आहे. विशेष म्हणजे, या सर्व प्रकरणात आरोपी सहज पकडले गेले. त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्नही केला नाही. त्याचबरोबर या घटनांचा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंध आहे का, याचाही तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा करत आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रGujaratगुजरात