शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

अनैतिक संबंधातून झालेल्या खुनाचे गूढ उकलले, प्रेयसीच्या पतीचा केला अडसर दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 17:50 IST

The mystery of the murder Solved : पोलिसांनीही आपले कसबपणाला लावून नेर शहरातील या हत्याकांडात तिघांना अटक केली.

नेर : प्रेयसीचा पती संबंधात अडसर ठरत असल्याने प्रियकराने मित्राच्या मदतीने त्याचा खून केला. मात्र घटनेचा देखावा तंतोतंत अपघातासारखा केला. त्यामुळे तीन वर्षानंतर हा गुन्हा उघड झाला आहे. त्यातही मृताच्या बहिणीने पुढे येत आरोपींवर संशय व्यक्त केला. पोलिसांनीही आपले कसबपणाला लावून नेर शहरातील या हत्याकांडात तिघांना अटक केली.

अनिल सुखदेव बोरकर (४०) यांचा २९ फेब्रुवारी २०२० रोजी बोंडगव्हाण रस्त्यावर मृतदेह सापडला होता. अनिलच्या अंगावर ओरबडल्याच्या खुणा होत्या. काही जखमाही दिसल्या. मात्र हा अपघात की हत्या या संभ्रमात पोलीस होते. गुन्ह्याची उकल झाली नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद घेतली. दरम्यानच्या काळात संजय अंबरसिंग आडे (२७) रा. मांगुळ ह.मु. हनुमाननगर नेर हा अनिलच्या पत्नीसोबत राहू लागला. त्याने अनिलच्या पत्नीच्या नावाने असलेल्या शेतावर कर्ज उचलून वाहन खरेदी केली. यावरून अनिलची बहीण शालू नरेश मेश्राम रा. भीमनगर नेर हिला संशय आला. तिने याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांना दिली. पोलिसांनी सखोल चौकशी करून तक्रारीत तथ्य असल्याचे लक्षात येताच आरोपी संजय आडे, त्याचा मित्र शुभम नारायण तडसकर रा. आसेगाव देवी, याेगेश अशोक घावडे रा. अंतरगाव ता. बाभूळगाव यांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. नेर ठाणेदार ज्ञानेश्वर घुग, फौजदार गजानन अजमिरे, प्रदीप खडके, राजेश चौधरी, सुनील राठोड यांनी गुन्ह्याचा तपास करीत आरोपींना अटक केली. पोलिसांनी कलम ३०२, २०१, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.अशी केली हत्या

अनिल बोरकर याला २८ फेब्रुवारी २०२० ला यवतमाळ येथे सोबत नेले. परत येत असताना आरोपींनी वाहनात शेल्याने गळा आवळून त्याचा खून केला. नंतर बोंडगव्हाण शिवारात मृतदेह फेकून अपघाताचा देखावा निर्माण केला, अशी कबुली पोलिसांकडे दिली.बॉक्स

योगेश भोंडेच्या खुनाचाही संशयआरोपी संजय आडे हा हनुमानगर येथे शालिक भोंडे यांच्याकडे किरायाने राहत होता. आरोपीचा घरमालकाचा मुलगा योगेश याच्याशी पैशाच्या उसनवारीवरून वाद असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे योगेशचा खून संजयने केला असावा असा संशय व्यक्त होत आहे. योगेश भोंडे याचा मृतदेह सोनवाढोणा घुई रस्त्यावर आढळला होता. मात्र या खुनाची संजयने अजूनपर्यंत कबुली दिली नसल्याचे ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे यांनी सांगितले. दोन्ही घटनेत गुन्ह्याची पद्धत जवळपास मिळती जुळती असल्याने पाेलीस त्या दिशेनेही तपास करीत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी