शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

टोपीमुळे सापडला खूनी, मृतदेहाचे गूढ कायम; बारा तासात आरोपी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 18:44 IST

Murder Case : दारूच्या नशेत मृत व्यक्ती आणि मोरे याच्यात वाद झाला आणि त्यात खून झाल्याची घटना घडल्याची माहीती डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांनी दिली.

डोंबिवली : येथील पश्चिमेकडील बावनचाळीतील रेल्वे ग्राऊंडवर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह खून केलेल्या अवस्थेत सोमवारी दुपारी आढळून आला होता. या मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसताना या खूनाचा गुन्हा उकल करण्यात विष्णुनगर पोलिसांना यश आले आहे. कोणताही पुरावा नसताना घटनास्थळी आढळुन आलेल्या एका व्यक्तीच्या टोपीमुळे आरोपी अर्जून आनंदा मोरे (वय ३९) याला अवघ्या १२ तासाच्या आत बेडया ठोकल्या आहेत. दारूच्या नशेत मृत व्यक्ती आणि मोरे याच्यात वाद झाला आणि त्यात खून झाल्याची घटना घडल्याची माहीती डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांनी दिली.

मृत व्यक्तीचे वय साधारण ४५ ते ५० वयोगटातील असून त्याच्या डोक्यावर आणि तोंडावर जोरात प्रहार केल्याच्या खुणा दिसत असल्याने त्याची हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला होता. विष्णुनगर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्यासह पोलिस निरिक्षक (गुन्हे)राहुलकुमार खिलारे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) मोहन खंदारे, सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश वडणे,  पोलिस उपनिरिक्षक कुलदीप मोरे आदिंची विशेष पथके खूनाचा तपास करण्याकामी गठीत करण्यात आली होती.

तपासादरम्यान घटनास्थळी एक जांभळया रंगाची टोपी निदर्शनास पडली. ही टोपी मारेक-याची असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांना होता. परंतू टोपीच्या वर्णनावरून आजुबाजुला चौकशी केली असता ती टोपी फिरस्ता राकेश पाटील नामक व्यक्तीची असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. त्याचा शोध घेतला तो डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात आढळुन आला. त्याच्याकडे चौकशी केली असता आम्ही ग्राउंडवर दारू पिण्यास बसलो असताना अर्जून आणि अनोळख्या व्यक्तीची वादावादी झाली. यात अर्जूनने संबंधित व्यक्तीवर दांडक्याने हल्ला केला. त्याला रोखण्याचा प्रयत्न केला पण त्याने ऐकले नाही अशी माहीती राकेशने पोलिसांना दिली. दरम्यान राकेशने दिलेल्या माहीतीवरून पोलिसांनी तपास करीत आरोपी अर्जूनला पश्चिमेकडील गांधी उद्यान परिसरातून अटक केली.मृतदेहाची ओळख पटलेली नाहीसोमवारी मृतदेह आढळून आला. परंतू अद्याप हा मृतदेह कोणाचा आहे याचा तपास लागलेला नाही. तो बिगारी काम करणारा असावा असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. त्याचे कोणी नातेवाईक आहेत का याचा शोध सुरू असल्याची माहीती सहाय्यक पोलिस आयुक्त कुराडे यांनी दिली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdombivaliडोंबिवलीArrestअटकDeathमृत्यू