शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीच्या दारातच उद्योजकाची हत्या; नाशिकमध्ये २५ दिवसांत आठवा खून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 06:36 IST

Nashik : गरवारे पॉइंट जवळील सिमेन्स कंपनीसमोर एका लहान इंजिनीअरिंग वर्क्स कंपनीत नेहमीप्रमाणे नंदकुमार आहेर (५२) आपल्या कारने आले.

नाशिक : येथील अंबड औद्योगिक वसाहतीत मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एका उद्योजकाला हल्लेखोरांनी तलवारीने भोसकून प्रवेशद्वारावरच ठार केल्याची घटना घडली. गेल्या पंचवीस दिवसांमध्ये नाशकात झालेली खुनाची ही आठवी घटना आहे. 

गरवारे पॉइंट जवळील सिमेन्स कंपनीसमोर एका लहान इंजिनीअरिंग वर्क्स कंपनीत नेहमीप्रमाणे नंदकुमार आहेर (५२) आपल्या कारने आले. प्रवेशद्वारावर कारमधून ते उतरले. त्याच वेळी दुचाकीने आलेल्या तिघांनी तलवार व अन्य धारदार हत्याराने त्यांच्यावर हल्ला चढवून सपासप वार केले. धावपळ व आवाज झाल्याने कंपनी कामगार, सुरक्षारक्षक बाहेर धावले असता आहेर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले.

त्वरित कामगारांनी रुग्णवाहिका बोलावून जवळच्या रुग्णालयात त्यांना दाखल केले. तेथून पुन्हा एका मोठ्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना उपचारादरम्यान मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त दर्जाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोलिसांना एक मोठी गंजलेली तलवार आढळून आली. 

हल्ला करणाऱ्या तिघांचा शोध सुरू आहे. गुन्हे शाखा व आयुक्तालयाचे पथक, फॉरेन्सिक पथक, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात शोध घेतला जात आहे. मे महिन्यात सहा आणि जूनमध्ये एका आठवड्यातच दोन खून झाल्याने नाशिककर हादरून गेले आहेत. 

मंत्र्यांचे नातेवाईक? मृत नंदकुमार आहेर हे राज्य मंत्रिमंडळातील एका सदस्याचे जवळचे नातेवाईक असल्याचे बोलले जात आहे.  आहेर यांच्या काकांची ही कंपनी असून तेच सर्व व्यावसायिक कामकाज बघत होते.  पोलीस अधिक बारकाईने तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक