शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

बलात्काराच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीने बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतले पेटवून

By सोमनाथ खताळ | Updated: May 24, 2023 00:15 IST

मंगळवारी रात्री ११:३० वाजता संदीप हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आला. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला असे म्हणत त्याने अंगावर डिझेल ओतून स्वतः ल पेटवून घेतले.

बीड  : रिक्षात विसरलेली पर्स वापस देण्याच्या बाहाण्याने विधवा महिलेच्या घरात घुसून रिक्षा चालकाने तिच्यावर अत्याचार केला. त्याचा व्हिडीओ तयार केला. तो व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल सात जणांनी २०१४ ते २०२१ अशीसात वर्षे अत्याचार केला होता. याप्रकरणी बीड शहर ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील मुख्य आरोपी संदीप पिंपळे याने मंगळवारी रात्री ११:३० वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतले, प्रकृती चिंताजनक असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे

बीड येथील एका विधवा महिलेची पर्स संदीप पिंपळे याच्या रिक्षात प्रवासा दरम्यान विसरली होती. पर्स वापस देण्याच्या बहान्याने पिंपळे याने महिलेस बीडमधील कबाड गल्लीतील रूमवर बोलून घेतले व या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. ही घटना २०१४ साली घडली होती. या कृत्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत ऑटोरिक्षा चालकाने तिला ब्लॅकमेल करत सतत तिच्यावर अत्याचार केला. त्याचप्रमाणे त्याचा नातेवाईक असणाऱ्या गोरख इंगोले याच्यासोबतही तिला बळजबरीने संबंध ठेवण्यास भाग पाडले. पुढे गोरख इंगोलेनेही ब्लॅकमेल करून तिच्यावर सतत अत्याचार केला. त्यानंतर २०१५ साली गोरख इंगोलेचा भाऊ बालाजी इंगोले याने देखील महिलेस ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार केला. तर २०२० मध्ये गोरख इंगोले याने जबरदस्तीने पीडितेला दुचाकीवर बसवून जरूड ते हिवरा पहाडी रोडलगत असणाऱ्या घाटात नेले. तेथे त्याच्या ४ मित्रांकडून आळीपाळीने तब्बल ६ तास तिच्यावर अत्याचार केला. यामुळे महिला गर्भवती राहिली. गोरख इंगोले याने जबरदस्तीने गर्भपात करून घेण्यासही पीडित महिलेस भाग पाडले. हा सर्व छळ त्रास सहन न झाल्याने पीडित महिला माजलगावला आली. येथील एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करू लागली. परंतू येथेही या तिघांनी येऊन तिच्याकडे शरिर सुखाची मागणी केली. वारंवारचा मानसिक व शारिरिक त्रास सहन न झाल्याने पीडितने बीड शहर ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरून संदीप पिंपळे (रा.कबाडगल्ली बीड), बालाजी इंगोले, गोरख इंगोले (दोघेही आहेर धानोरा ता.बीड) यांच्यासह अनोळखी चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

दरम्यान यातील एकही आरोपी अद्याप अटक नव्हता. मंगळवारी रात्री ११:३० वाजता संदीप हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आला. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला असे म्हणत त्याने अंगावर डिझेल ओतून स्वतः ल पेटवून घेतले. नियंत्रण कक्षातील पोलिसांनी त्याला तत्काळ बाजूला असलेल्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु जास्त प्रमाणात भाजल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड