शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमप्रकरणाची माहिती प्रेयसीच्या भावाला दिली, प्रियकराने दगडाने ठेचून हत्याच केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 06:37 IST

खुनाची घटना उघडकीस आल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासातच संशयितांना अटक केली.

जळगाव : प्रेम प्रकरणाची माहिती प्रेयसीच्या भावाला दिल्याच्या रागातून दोघांनी पार्टी करण्याच्या बहाण्याने बोलावून घेत अनिकेत गणेश गायकवाड (वय २०, रा. राजमालती नगर, जळगाव) या तरुणाची चाकूने भोसकून तसेच दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री पिंप्राळा रेल्वे गेटनजीकच्या मालधक्क्यालगत घडली. सागर बाळू समुद्रे (वय १९, रा. राजमालती नगर) व सुमीत संजय शेजवड (वय १९, रा.हुडको, पिंप्राळा) या दोघांना पोलिसांनी बुधवारी पहाटेच ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर समुद्रे याचे एका तरुणीशी प्रेमप्रकरण होते. या तरुणीचा भाऊ अनिकेतचा मित्र होता. सागर व अनिकेत दोघं एकाच भागात राहात असल्याने त्यांच्यात ओळख व मैत्रीही होती. सागरच्या प्रेमप्रकरणाची माहिती अनिकेत याने तरुणीच्या भावाला दिली होती, शिवाय ‘मी तुझं काम लावलं आहे’ असे अनिकेत सागरला बोलला होता. त्यामुळे त्याचा राग सागरला आला होता. दोन दिवसापासून अनिकेतला खुन्नसही देत होता. त्यामुळे सागर याने सुमीत शेजवडला सोबत घेऊन अनिकेतचा गेम करायचा प्लॅन तयार केला.

दारू, पावभाजीवर ताव मारून केला गेमसागर व सुमीत यांनी मंगळवारी रात्री अनिकेत याला पार्टीसाठी बोलावले. तिघांसाठी त्यांनी दारू, पाणी बाटल्या व पावभाजी घेतली. रेल्वे मालधक्क्यावर दोघांनी दारू पिण्याचे नाटक करून अनिकेतला जास्त दारू पाजली. त्यानंतर २ वाजता सागर याने चाकू काढून अनिकेतच्या डोक्यात घातला. मात्र हा चाकू लगेच तुटला. गंभीर दुखापत झाल्याने अनिकेतने तेथून निसटण्याचा प्रयत्न केला. थोड्या अंतरापर्यंत पळताच मागून दोघांनी त्याला पकडले. डोक्यात तीन वेळा दगडाने वार केले. त्यामुळे त्याच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा होऊन मेंदूच बाहेर आला. अनिकेतचे काम झाल्याची खात्री पटल्यावर दोघांनी तेथून पळ काढला.

काही तासातच एलसीबीने आवळल्या मुसक्याखुनाची घटना उघडकीस आल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासातच संशयितांना अटक केली. एकाच वेळी दोघांना पहाटेच्या सुमारास मेहरुन तलावाजवळून ताब्यात घेण्यात आले. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सहायक फौजदार रवी नरवाडे, युनूस शेख, संजय हिवरकर, राजेश मेढे, सुनील दामोदरे, संतोष मायकल व आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव