शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

साध्वी प्रज्ञा यांना सेक्सटॉर्शन कॉल करणार्‍यांनी अशी घडवली घटना, चौकशीत झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 18:02 IST

Sextortion Call :चौकशीत त्याने गुन्हा करण्याचे दोन मार्ग सांगितले. या मोडस ऑपरेंडीबाबत पोलिसांनाही आश्चर्य वाटले आहे.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना सेक्सटोर्शन कॉल करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पकडले आहे. भोपाळमध्ये चौकशीदरम्यान आरोपीने अनेक खुलासे केले आहेत. चौकशीत त्याने गुन्हा करण्याचे दोन मार्ग सांगितले. या मोडस ऑपरेंडीबाबत पोलिसांनाही आश्चर्य वाटले आहे.चौकशीदरम्यान, आरोपीने सांगितले की, ते आधी गुगलवर वरिष्ठ राज्य अधिकारी/नेत्यांच्या मोबाईल नंबरची यादी शोधायचे. सर्चमध्ये सापडलेल्या नंबरवर व्हॉट्सअॅपद्वारे मेसेज पाठवायचे. मेसेजचा रिप्लाय मिळाल्यानंतर तो एक ओळखीचे नाव सांगून चॅटिंग करण्याचा प्रयत्न करायचा. यानंतर ते थेट व्हिडीओ कॉल करायचे आणि इतर मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ दाखवून व्हिडिओ कॉलरची स्क्रीन रेकॉर्ड करायचे.स्क्रीन रेकॉर्डिंगचा व्हिडीओ बनवल्यानंतर त्या रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेऊन ते फेसबुक मेसेंजरवर पीडितेच्या ओळखीच्या व्यक्तींना पाठवायचे. हा स्क्रीनशॉट घेऊन ते पीडितेला ब्लॅकमेल करायचे आणि पैशाची मागणी करायचे. ब्लॅकमेल करून मिळालेले पैसे तो त्याच्या बनावट बँक खात्यात जमा करायचा आणि टोळीचे इतर साथीदार एटीएममधून पैसे काढून आपापसात वाटायचे.संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखलभोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना तिच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल करून सेक्सटोर्शन करून धमकी देणाऱ्यांविरुद्ध कलम ३५४ (अ), ५०७, ५०९ आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा सायबर क्राईमशी संबंधित असल्याने सायबर क्राईम भोपाळने तपास केला होता.सायबर क्राईम टीमने मोबाईल नंबरच्या लोकेशनच्या आधारे आरोपीची ओळख पटवली, जो बास तहसील नगर पोलीस स्टेशन सीकरी जिल्हा भरतपूर, राजस्थान चांदा गावचा आहे. पोलीस पथकाने 5 दिवस सतत आरोपींची ओळख पटवून आणि त्यांच्याकडून घटनेचे ठिकाण शोधून काढली. भोपाळ पोलिसांच्या पथकाने मोहरीच्या शेतात नाकाबंदी करून आरोपींना अटक केली असून या प्रकरणातील दोन आरोपींकडून 03 मोबाईल आणि 04 सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. वारिस खान आणि रवीन खान अशी अटक आरोपींची नावे आहेत.

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurप्रज्ञा सिंह ठाकूरCrime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसArrestअटक