उत्तर प्रदेशच्यामेरठमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने आपली पहिली पत्नी मृत असल्याचे खोटे सांगून दुसरे लग्न केले. दुसऱ्या पत्नीला एका फोन कॉलमुळे पतीच्या पहिल्या लग्नाबद्दल समजले. त्यानंतर पती आपल्या संपूर्ण कुटुंबासह फरार झाला. आता दुसऱ्या पत्नीने पतीविरोधात पोलीस ठाण्यात फसवणूक करून लग्न केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.
पती फरार, पत्नीची पोलिसांत तक्रारपोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथील रहिवासी जैनब हिचा खुर्शीद नावाच्या व्यक्तीशी विवाह झाला होता. जैनब आपल्या पतीसोबत हरिद्वारमधील भगवानपूर येथे भाड्याच्या घरात राहत होती. गुरुवारी ती लिसाडी गेट पोलीस ठाण्यात पोहोचली आणि आपल्या पतीने फसवणूक करून लग्न केल्याचा आरोप तिने केला.
पीडित महिलेने काय सांगितले?पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, सुमारे एक वर्षापूर्वी तिची समर गार्डन येथे राहणाऱ्या खुर्शीदशी भेट झाली होती. त्यानंतर खुर्शीदने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने तिला सांगितले की, त्याची पहिली पत्नी मरण पावली आहे आणि त्याला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. यानंतर दोघांनी लग्न केले.
फोन आल्यानंतर उघड झाले रहस्यपीडितेने पुढे सांगितले की, लग्नानंतर तिच्या पतीने तिला भगवानपूरमधील एका भाड्याच्या घरात ठेवले. एक दिवस तिचा पती बाथरूममध्ये असताना त्याच्या मोबाइलवर एका महिलेचा फोन आला. तिने तो फोन उचलला असता, पलीकडील महिलेने आपण खुर्शीदची पत्नी बोलत असल्याचे सांगितले. यानंतर घरात मोठा राडा झाला.
या घटनेनंतर खुर्शीद गेल्या १५ दिवसांपासून घरी परतला नाही. अखेर पीडितेने पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकला असता, खुर्शीद आणि त्याचे संपूर्ण कुटुंब घरातून फरार झाले होते. पोलीस आता आरोपीचा शोध घेत आहेत.