घराला १०० हून अधिक सापांनी घेरलं; पोलिसांना सापडला एक मृतदेह, अंगावर काटा आणणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 19:31 IST2022-01-21T19:30:53+5:302022-01-21T19:31:30+5:30
या व्यक्तीच्या घराला सापांनी घेरलेले पाहून आसपासच्या लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचली

घराला १०० हून अधिक सापांनी घेरलं; पोलिसांना सापडला एक मृतदेह, अंगावर काटा आणणारी घटना
मॅरिलँड – अमेरिकेतील मॅरिलँड येथे खळबळजनक प्रकार समोर आला आहे. साप म्हटलं तरी प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकतो. त्यात १, २, ३ नव्हे तर तब्बल १०० साप एखाद्याच्या समोर दिसले तर काय होईल त्याची कल्पनाच न केलेली बरी. मात्र मॅरिलँडच्या परिसरात एका व्यक्तीच्या घराला १०० हून अधिक सापांनी घेरलं होतं. १९ जानेवारी संध्याकाळी ६ वाजताची ही घटना आहे.
या व्यक्तीच्या घराला सापांनी घेरलेले पाहून आसपासच्या लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचली. शेजाऱ्यांनी घरातील व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून दिसला नाही असं सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सापातून मार्ग काढत त्याच्या घरात प्रवेश केला. तेव्हा समोरील दृश्य पाहून ते हैराण झाले. एक ४९ वर्षीय व्यक्ती जमिनीवर पडल्याचं पाहायला मिळालं.
या घटनेची माहिती इमरजेन्सी मेडिकल सर्व्हिस आणि फायर ब्रिगेड यांनाही कळवण्यात आली. तेव्हा या पथकाने काही सापांना पकडलं. त्यानंतर त्या व्यक्तीचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी हॉस्पिटलला पाठवण्यात आला. नेमकं हा काय प्रकार आहे? त्या व्यक्तीचा मृत्यू कसा झाला? यात काहीतरी संशयास्पद असल्याचं पोलिसांना वाटतं. मृत व्यक्ती कोण आहे ही माहितीही अद्याप समोर आली नाही.
चार्ल्स काउंटी शेरिफच्या ऑफिसमधून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. ज्यात पोलिसांना घरात आणि बाहेरुन १०० हून अधिक साप आढळले. या घरात आणि बाहेर इतके साप कसे आले याबाबत शेजारीही अनभिज्ञ आहेत. चार्ल्स काऊंटी एनिमल कंट्रोलच्या सदस्यांनी या सापांना पकडण्यात मदत केली. एनिमल कंट्रोलचे प्रवक्ते जेनिफर हॅरिस यांनी सांगितले की, १२५ साप या व्यक्तीच्या घरात आणि बाहेर आढळून आले. घरात सर्वात मोठा १४ फूट लांबीचा पायथन आढळला. अमेरिकेत इतक्या मोठ्या संख्येत साप आढळणं मागील ३० वर्षात पहिल्यांदाच घडलं आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ माजली आहे. १०० हून अधिक साप परिसरात आढळल्याने याठिकाणी राहणारे रहिवासी दहशतीखाली जगत आहेत.