हॉटेलचा मॅनेजरच चालवत होता सेक्स रॅकेट; अल्पवयीन मुलींची सुटका, गुन्हे शाखेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 21:10 IST2023-12-07T21:09:59+5:302023-12-07T21:10:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अंधेरीतील सिल्वर क्लाउड हॉटेल' च्या मॅनेजरच्या मदतीने सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यास गुन्हे ...

हॉटेलचा मॅनेजरच चालवत होता सेक्स रॅकेट; अल्पवयीन मुलींची सुटका, गुन्हे शाखेची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अंधेरीतील सिल्वर क्लाउड हॉटेल' च्या मॅनेजरच्या मदतीने सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यास गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईत एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्वेकडील मरोळ मोराशी रोड परिसरातील सिल्वर क्लाऊड हॉटेल' पहिला मजलावर सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार, कक्ष १० च्या पथकाने बोगस ग्राहक पाठवून छापा टाकला. तेव्हा, एक अल्पवयीन मुलगी मिळून आली. तेथून एका महिलेसह पुरुष दलालाला पोलिसांनी ताब्यात घेत मुलीची सुटका केली. आरोपींकडे दोन मोबाईल आणि सात हजारांची रोकड मिळून आली. त्यानुसार, एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवत पोलीस अधिक तपास करत आहे.
हॉटेल मॅनेजरच्या मदतीने अल्पवयीन मुलींचे सेक्स रॅकेट सुरू होते. याप्रकरणी दोघांना अटक करत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. यामध्ये आणखीन किती मुली अडकल्या आहे? याबाबत तपास सुरू आहे.