हरयाणातील गुरुग्राम येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका १९ वर्षीय तरुणीसोबत तिच्या लिव्ह-इन पार्टनरने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. सध्या पीडित तरुणीवर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे.
डेटिंग ॲपवर ओळख आणि लिव्ह-इन पार्टनर - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित तरुणी त्रिपुराची रहिवासी आहे. ती शिक्षणासाठी गुरुग्राम येथे आली होती आणि सेक्टर ६९ मधील पीजीमध्ये राहत होती. सप्टेंबर २०२५ मध्ये एका डेटिंग ॲपच्या माध्यमाने तिची ओळख दिल्लीतील नरेला येथील शिवम (१९) सोबत झाली. या ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले आणि दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. पीडितेच्या म्हणण्यानुसार, दोघेही लवकरच लग्न देखील करणार होते.
संशयाची पाल चुकचुकली अन्... - काही काळानंतर आरोपी शिवमने तरुणीवर संशय घेण्यास सुरुवात केली. यातूनच तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाला. १६ फेब्रुवारी रोजी आरोपीने तिला अत्यंत निर्दयीपणे मारहाण केली.
थरकाप उडवणारी घटना -पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तिच्या डोक्यावर स्टीलच्या बाटलीने आणि मातीच्या भांड्याने हल्ला केला, तिचे डोके भिंतीवर आपटले आणि तिच्या प्रायव्हेट पार्टवर सॅनिटायझर ओतून आग लावण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर, त्याने तिच्या पायांवर चाकूने वारही केले आणि तिला जीवे मारण्याची धमकीही दिली.
आईला फोन केला म्हणून जीव वाचला -माध्यमांतील वृत्तानुसार, घटनेच्या दोन दिवसांनंतर, पीडितेने १८ फेब्रुवारीच्या रात्री आरोपीच्या फोनवरून कसाबसा आपल्या आईला फोन केला आणि बंगाली भाषेत संपूर्ण आपबीती सांगितली. यानंतर आईने तातडीने ११२ क्रमांकावर तातडीने फोन करून पोलिसांना माहिती दिली. यावर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तरुणीला वाचवून रुग्णालयात दाखल केले. तसेच आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले आहे.
Web Summary : In Gurugram, a man brutally assaulted his live-in partner, attempting to burn her private parts with sanitizer. The victim, from Tripura, met the accused on a dating app. Police arrested the accused after the victim contacted her mother.
Web Summary : गुरुग्राम में एक व्यक्ति ने अपनी लिव-इन पार्टनर के साथ बेरहमी से मारपीट की और सैनिटाइजर से उसके निजी अंगों को जलाने की कोशिश की। त्रिपुरा की पीड़िता डेटिंग ऐप पर आरोपी से मिली थी। पीड़िता द्वारा अपनी मां से संपर्क करने के बाद पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया।