The Great Khali: 'द ग्रेट खली'ने टोल प्लाझावर घातला गोंधळ, कर्मचाऱ्याच्या मारली कानाखाली; VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 21:22 IST2022-07-12T21:17:05+5:302022-07-12T21:22:15+5:30
The Great Khali: ओळखपत्र मागितल्याने खलीने टोल प्लाझा कर्मचाऱ्याला कानाखाली मारल्याचा दावा या व्हिडिओद्वारे केला जात आहे.

The Great Khali: 'द ग्रेट खली'ने टोल प्लाझावर घातला गोंधळ, कर्मचाऱ्याच्या मारली कानाखाली; VIDEO
माजी वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE) चॅम्पियन 'द ग्रेट खली' म्हणजेच दलीप सिंग राणा यावेळी टोल प्लाझा कर्मचाऱ्यांशी भांडताना दिसला. ही प्रत्यक्षात घडलेली घटना आहे. खलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ओळखपत्र मागितल्याने खलीने टोल प्लाझा कर्मचाऱ्याला कानाखाली मारल्याचा दावा या व्हिडिओद्वारे केला जात आहे. तर व्हिडिओमध्ये खली म्हणत आहे की, कर्मचारी त्याला ब्लॅकमेल करत आहेत. एक कर्मचारी फोटो काढण्यासाठी गाडीत घुसत असतानाच हा प्रकार घडला.
खली जालंधरहून कर्नालला जात होता
ग्रेट खली जालंधरहून कर्नालला जात असतानाची ही घटना आहे. दरम्यान, फिल्लोरजवळील टोल प्लाझाचा हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. खलीने सांगितले की, एक कर्मचारी फोटो काढण्यासाठी कारमध्ये घुसला होता. नकार दिल्याने वाद झाला. यानंतर बाकीचे कर्मचारी आले आणि त्यांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला आणि ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.