शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीनेच केले मुख्याध्यापकाचे अपहरण, मागितली 30 लाखांची खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 11:33 IST

प्रदीप हरिराम मोतीरामानी (४६, क्रिष्णाती चौक, जरीपटका) असे अपहरण झालेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे.

नागपूर : प्रेम प्रकरणातून प्रेयसीनेच आपला घटस्फोटीत पती आणि त्याच्या मित्रांच्या साह्याने ३० लाखांच्या खंडणीसाठी प्रियकराचे अपहरण केल्याची घटना जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत घडली. पैसे न दिल्यास मृतदेहच पाठविण्याची धमकी आरोपींनी दिल्यामुळे पोलिसांत प्रचंड खळबळ उडाली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासांतच या अपहरण नाट्यावर पडदा टाकून तीन आरोपींना अटक केली असून एक जण फरार आहे.प्रदीप हरिराम मोतीरामानी (४६, क्रिष्णाती चौक, जरीपटका) असे अपहरण झालेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. तर रिना फ्रान्सिस (मंगळवार कॉम्प्लेक्स), नोएल फ्रान्सिस (४४, महाराणा अपार्टमेंट, मानकापूर), सूरज फलके (२०) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील विक्की जैस हा आरोपी फरार आहे. प्रदीप मोतीरामानी हे जरीपटक्याच्या महात्मा गांधी शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. याच शाळेत रिना फ्रान्सिस ही शिक्षिका म्हणून कार्यरत होती. दरम्यान, रिना आणि प्रदीप यांचे सुत जुळले. त्यानंतर रिनाने तेथून नोकरी सोडून हिंगण्याच्या एका शाळेत नोकरी सुरू केली. रिना आणि तिचा पती नोएल यांना एक मुलगी आहे. परंतु आपसात पटत नसल्यामुळे त्यांनी २००९ मध्ये घटस्फोट घेतला. दुसऱ्या शाळेत शिकविणे सुरू केले तरीही रिना आणि प्रदीपचे प्रेमसंबंध कायम होते. अशातच आर्थिक तंगीतून रिना आणि तिच्या घटस्फोट झालेल्या पतीने प्रदीपच्या अपहरणाचा बेत आखून शुक्रवारी रात्री १०.३० वाजता त्याचे अपहरण केले. परंतु पोलिसांना माहिती मिळाल्याचे पाहून आरोपींनी शनिवारी दुपारी ३ वाजता प्रदीपला सोडून दिले. प्रदीपचे अपहरण झाल्याची तक्रार त्यांची पत्नी ज्योती प्रदीप मोतीरामानी (४६) यांनी जरीपटका ठाण्यात दिली. 

अपहरण करून नेले मानकापूरमधील फ्लॅटवररात्री १०.३० वाजता प्रदीपचे अपहरण करण्यात आले. आरोपींनी प्रदीपला विक्की जैस याच्या व्हेर्ना कारमध्ये बसवून मानकापूरच्या महाराणा १ अपार्टमेंटमध्ये पहिल्या माळ्यावर राहत असलेल्या नोएल फ्रान्सिसच्या फ्लॅटवर नेले. रात्रभर प्रदीपला आरोपींनी तेथेच ठेवले. दरम्यान, सकाळी त्याच्याच मोबाईलवरून ३० लाखांची खंडणी मागितली. परंतु पोलिसांना माहीत झाल्यामुळे घाबरून दुपारी सोडून दिले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस